उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील धारासूरमर्दिनी देवी मंदिरात  नवरात्र उत्सवानिमित्त सोमवारी (दि.11) ज्ञानदीप महिला मंडळाने भजनसेवा देवीचरणी अर्पण केली. महिला मंडळाने मंदिरात देवीची गाणी व भजने गावून सेवा दिली.

नवरात्र उत्सवाच्या निमित्ताने धारासूरमर्दिनी मंदिरावर आकर्षक विद्युत रोषणाई करण्यात आली असून परिसर पहाटेपासून भक्तांनी गजबजून जात आहे. यामध्ये महिला भाविकांची संख्या लक्षणीय आहे. शहराच्या विविध भागातील भाविक दर्शनासाठी येत आहेत. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर मंदिर समितीच्या वतीने आवश्यक ती खबरदारी घेण्यात येत आहे. 


 
Top