उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्हयामध्ये अतिवृष्टीने शेतक­-यांचे मोठया प्रमाणात नुकसान झालेले आहे. खुप खर्च करुन व खुप मेहनत घेऊन राबराब राबलेल्या शेतक­-यांचा हातातोंडाशी आलेला घास नियतीने हिरावून घेतल्यामुळे शेतक­-यांची आवस्था फारच दयनीय झालेली आहे. त्यामुळे कोडमडलेल्या शेतक­-यांना उभा करण्यासाठी राज्य शासनाने तातडीने पाऊल उचलून शेतक­-यांना हेक्टरी 50 हजार रुपये मदत द्यावी ओला दुष्काळ जाहिर करावा मृत्युमुखी पडलेल्या पशुधनासाठी शेतक­-यांना 50 हजार रुपये मदत द्या. इत्यादी मागण्या तातडीने पूर्ण कराव्यात अन्यथा भारतीय जनता पार्टी किसान मोर्चा रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन करेल असा इशारा किसान मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे देण्यात आला आहे. यावेळी उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी शासनाला तातडीने कळविण्याचे सांगितले. 

निवेदन देताना भारतीय जनता पार्टी किसान मोर्चाचे पूर्व मराठवाडा संपर्क प्रमुख तथा माजी जिल्हा परिषद  सदस्य रामदास कोळगे, भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा पंचायत समिती सदस्य प्रदीप शिंदे, उस्मानाबाद पंचायत समिती माजी सभापती तथा विद्यमान सदस्य बालाजी गावडे, माजी पंचायत समिती सदस्य नंदकुमार माळी, संतोष आगलावे, अखिल रोडे,महेश चांदणे, त्रिंबक सुरवसे आदींची उपस्थिती होती. 

 
Top