तेर / प्रतिनिधी    

अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन पिकाची  विभागीय कृषी सहसंचालक साहेबराव देवकर यांनी   वानेवाडी ता. उस्मानाबाद येथे पाहणी केली. 

यावेळी त्यांनी ज्या शेतकऱ्यांनी सन 2021 खरीप हंगामामध्ये विमा भरलेला आहे. त्या सर्व शेतकऱ्यांनी विमा नुकसान भरपाई मिळणे बाबत क्रॉप इन्शुरन्स किंवा फार्म मित्र ॲप वर तक्रार अर्ज दाखल करा आणि ज्या शेतकऱ्यांना ऑनलाइन तक्रार अर्ज दाखल करता येत नाही त्यांनी ऑफलाइन पद्धतीने अर्ज तालुका कृषी अधिकारी कार्यालय, उस्मानाबाद येथे दाखल करावा याबाबत सूचना दिल्या. सर्व कर्मचाऱ्यांनी तात्काळ पिकविमा बाबतची तक्रार अर्ज निकाली काढावे .त्याचबरोबर लवकरात लवकर पंचनामे पूर्ण करणे बाबत सुचित केले.

 यावेळी तालुका कृषी अधिकारी उस्मानाबाद ज्ञानेश्वर जाधव ,विमा कंपनी तालुका प्रतिनिधी धनंजय सुरवसे ,कृषी सहाय्यक वैभव लेनेकर, शेतकरी बळीराम उंबरे, हरी उंबरे, सोमनाथ उंबरे ,संजय उंबरे , गंगाधर उंबरे,गणेश उंबरे, प्रदीप घेवारे, कालिदास उंबरे, दत्तात्रय कदम उपस्थित होते.


 
Top