उस्मानाबाद / प्रतिनिधी-

तालुक्यातील दारफळ येथील शेतकरी रणजित इंगळे व सुरज नागटिळक यांना कडबाकुट्टी देण्यात आली आहे. सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१९) कडबा कुट्टीचे पूजन करून वाटप करण्यात आले.

दारफळ येथील शेतकरी रणजित इंगळे व सुरज नागटिळक यांच्याकडे जनावरे आहेत. मात्र कडबाकुट्टीची व्यवस्था नव्हती. तसेच दावणीमधील कडबासह इतर चारा जनावरांच्या पायाखाली येवून नुकसान होत होते. याबाबत शेतकरी इंगळे व नागटिळक यांनी सारोळा ग्रामपंचायत सदस्य विनोद बाकले यांच्याकडे कडबाकुट्टीची मागणी केली होती. त्यानंतर श्री बाकले यांनी दोन कडबाकुट्टी उपलब्ध करून दिल्या आहेत. मंगळवारी या कडबाकुट्टीचे ज्येष्ठ शेतकरी मुरताज शेख, नारायण इंगळे व विनोद बाकले यांच्या हस्ते पूजन करण्यात आले. यावेळी चिखलीचे ग्रामपंचायत सदस्य तेजस सुरवसे, विष्णू नरवडे, सचिन काळे, ऋषीकेश इंगळे, शाहरूख सय्यद आदींसह शेतकरी उपस्थित होते. 


 
Top