तुळजापूर  / प्रतिनिधी-

 जिल्ह्यातील नळदुर्ग हे ऐतिहासिक शहर असून निजामाच्या कारकीर्दित १८६०-१९०४ पर्यन्त नळदुर्ग हे जिल्ह्याचे ठिकाण होते,त्यानंतर १९०४-०५ पर्यन्त तालुका व त्याच्या नंतर तूळजापुर तालुक्याची निर्मिती झाली,तूळजापुर तालुक्याचे मुन्सिफ़ कोर्ट १९०९-१९५१ पर्यन्त नळदुर्ग येथेच होते,महाराष्ट्र शासनाने ज्या-ज्या वेळेस जिल्हा व तालुका पुनर्रचना समित्या स्थापन केल्या,त्या समित्यानी नळदुर्गला भेट देऊन नळदुर्ग तालुका निर्मितीच्या दृर्ष्टिने सोई सुविधेचे व अत्यंत कमी खर्चात निर्मिती होण्याचा अहवाल शासनाकडे सादर केला आहे,सद्या शहराशी निगडित व दाखल होणारे ६०-७० गावातील लोकांची गरज पाहता नळदुर्ग तालुका होने गरजेचे आहे,शहरातील अनेक इमारती रिकाम्या अवस्थेत आहेत,त्याचा कार्यालय म्हणून उपयोग केला जाऊ शकतो,संकल्पित नळदुर्ग तालुक्याचा २१ पानी अहवाल महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने जिल्हाधिकारी यांच्या मार्फ़त राज्याचे मुख्यमंत्री यांच्याकड़े सादर केला करण्यात आला आहे.

सादर केलेल्या हवालामध्ये,निवेदन,संकल्पित नळदुर्ग तालुक्याचा नकाशा,प्राथमिक माहिती,ऐतिहासिक पार्श्वभूमि, प्रसिद्ध देवस्थाने,भौगोलिक क्षेत्रफळ, लोकसंख्या, सोयी-सुविधा, सुविधेचा अभाव,उद्योग-धंदे, नगरपालिका, ग्रामपंचायत,ग्रुप ग्रामपंचायती, विविध समित्याचा अहवाल,तालुका कार्यालयासाठी उपलब्ध इमारती व जागा, याची माहिती सादर केली आहे,अहवालामध्ये दिलेल्या निवेदनावर मनसेचे जिल्हाध्यक्ष , जिल्हा सचिव ज्योतिबा येडगे,जिल्हा उपाध्यक्ष महेश जाधव, ता.अध्यक्ष मल्लिकार्जुन कुंभार,जनहित कक्ष व विधि वि. ता.अध्यक्ष अॅड. मतीन बाडेवाले,शहराध्यक्ष अलिम शेख,शहर सरचिटणीस प्रमोद कुलकर्णी,शहर उपाध्यक्ष रमेश घोड़के, शहर संघटक रवि राठोड यांच्या स्वाक्षरी आहेत . या  अहवालाचे संकलन नळदुर्ग शहरसचिव श्री.प्रमोद कुलकर्णी यांनी केले आहे .

 
Top