उस्मानाबाद / प्रतिनिधी-

राष्ट्रीय काँग्रेस मानवी हक्क विभागाच्या जिल्हा कार्याध्यक्षपदी अहमद बी मोहम्मद चाऊस यांची निवड करण्यात आली.

 ही निवड एका बैठकीत करण्यात आली. या बैठकीच्या अध्यक्षस्थानी काँग्रेसचे जिल्हा कार्याध्यक्ष खलील सय्यद व मानवी हक्क विभागाचे प्रदेश जनरल सेक्रेटरी ॲड. विश्वजीत शिंदे यांच्या उपस्थितीत काँग्रेस मानवी हक्क विभागाचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर लोंढे यांनी निवडीचे पत्र दिले आहे. यावेळी ऍड जावेद काझी, अरेफ मुलानी, फरीद पिरजादे, मसूद शेख, अरबाज शेख, सादिक शेख, शाहजाद उर्फ अज्जू शेख  आदीसह कार्यकर्ते उपस्थित होते. उपस्थितांनी चाऊस यांना पुढील राजकीय वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.

 
Top