उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरातील ठाकरे नगर येथील जिव्हाळा ग्रुपच्यावतीने येडेश्वरी मंदिर येथे नवरात्र महोत्सवानिमित्त मार्गदर्शक शिवसेनेचे उपशहरप्रमुख प्रशांत साळुंके यांच्या मार्गदर्शनाखाली विविध सामाजिक सांस्कृतिक व आरोग्यविषयक शिबिराचे आयोजन करून नवरात्र महोत्सव साजरा करण्यात आला गेली १९ वर्षापासून ठाकरे नगर भागात असलेल्या जागृत येडेश्वरी मंदिर येथे परिसरातील तसेच शहरातील नागरिकांसह महिलांची मोठी गर्दी पाहायला मिळते जिव्हाळा ग्रुप च्यावतीने नवरात्रात दररोज पहाटे भोगी व शहरातील मान्यवरांच्या हस्ते आरती करण्यात येते आत्तापर्यंत शिवसेनेचे खासदार ओमप्रकाश राजेनिंबाळकर राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते जीवनराव गोरे राष्ट्रवादीचे जिल्हा कार्याध्यक्ष संजय पाटील दुधगावकर शिवसेनेचे माजी शहरप्रमुख प्रवीण कोकाटे भाजपा नेते विनोद गपाट शिवसेनेचे नगरसेवक सुरज साळुंके दीपक जाधव युवा सेनेचे उपजिल्हाप्रमुख निलेश शिंदे डॉ. आशिष काळे पाटील बांधकाम व्यावसायिक लक्ष्मण गवळी यांच्या हस्ते मानाची देवीची आरती करण्यात आली.

   आरोग्य शिबिरामध्ये रक्तगट तपासणी मधुमेह रक्तदाब रक्तगट तपासणी करून ३२० जणांना पुढील उपचारासाठी अक्षय हॉस्पिटलचे डॉ आशिष काळे पाटील यांचेकडून पुढील वैद्यकीय उपचारासाठी लागणाऱ्या खर्चातून सामाजिक उपक्रम राबविल्याबद्दल ५० टक्के सवलत देखील देण्यात येत आहे नेत्र तपासणी शिबिरामध्ये आतापर्यंत १८० जणांची तपासणी करण्यात आली असून ११० जणांना मोफत औषधोपचार व चष्म्यांचे वाटप देखील करण्यात येणार आहे

  सांस्कृतिक मेजवानी म्हणून नृत्य स्पर्धा तसेच रांगोळी संगीत व धावण्याची शर्यत देखील आयोजित करण्यात आली होती    तसेच मंडळाकडून गेली १९ वर्षांपासून येरमाळा येथील येडेश्वरी मंदिरापासून भवानी ज्योतीचे देखील आयोजन करण्यात येते नवरात्रीतले ९ दिवस दुर्गा सप्तशती पाठ ९ कन्याची विधिवत पूजा करून कुंकुमार्चन व दररोज सायंकाळी विविध आराधी मंडळाचे गीत गायनाचे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे

   १४ ऑक्टोबर रोजी होम हवन कार्यक्रमांमध्ये बकऱ्याची आहुती दिली जाणार असून १९ ऑक्टोबर रोजी कोजागिरी पौर्णिमेला महाप्रसाद करून सांगता होणार असल्याचे मंडळाचे मार्गदर्शक प्रशांत साळुंके यांनी सांगितले

 
Top