उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मंत्र्यालयात प्रवेश करण्यासाठी आवश्यक असलेले प्रवेश पास बंद करण्यात आलेले आहेत. परंतू शेतकरी, शेतमजुर यांच्यासह सर्व सामान्य नागरिकांना इतर आवश्यक कामांसाठी मंत्रालयात प्रवेश मिळत नसल्यामुळे त्यांची आडचण होत आहे. त्यामुळे शेतकऱ्यांसह सर्वसामान्यांना मंत्रालयातील पास सुरू करण्यात यावेत, अशी  मागणी राष्ट्रीय किसान बहुजन पार्टीचे अध्यक्ष  अरूण निटुरे यांनी प्रधान सचिव यांच्याकडे एका निवेदनाद्वारे केले आहे. 

दिलेल्या निवेदनात असे नमुद करण्यात आले आहे की, मंत्रालयात कामासाठी आलेल्या शेतकऱ्यांसह सर्व सामान्य नागरिकांना प्रवेश पास मिळत नसल्यमुळे मंत्रालयात जाता येत नाही, त्यामुळे त्यांची कामे खोळबल्याने अडचण होऊन बसली.त्यामुळे ते निराशेच्या गर्तेत हताशपणे गावाकडे कामाविना परतत आहेत. मात्र, कांही वशीलेबाजांना मंत्रालयात प्रवेश दिला जात असल्यामुळे गोरगरीब जनता त्यांचा कुठेच वशिला नसल्यामुळे ते यापासून वंचित राहत आहेत, त्यामुळे आपण ही बाब मुख्यमंत्र्यांना आपल्या स्तरावर चर्चा करून निदर्शनास आणून दयावी व गोरगरिबांची होणाऱ्या समस्यातून सुटका करावी, अशी मागणी निटुरे यांनी केले. 


 
Top