शेतकरी विरोधी कायदा व लखीमपूर येथे शेतकऱ्यांना गाडीखाली चिरडून मारल्याच्या निषेधार्थ महाविकास आघाडीच्या वतीने पुकारलेल्या बंदला उस्मानाबाद जिल्हयात दुपार पर्यंत शंभर टक्के प्रतिसाद मिळाला.तुळजापूर शहरात मात्र तुळजाभवानी नवरात्र महोत्सव सुरू असल्यामुळे शहरामध्ये बंदला प्रतिसाद मिळाला नाही. 
केंद्र सरकारने आणलेला शेतकरी विरोधी कायदा व लखीमपूर येथे झालेल्या दुर्घटनेच्या निषेधात उस्मानाबाद शहरात दुपारी १ पर्यंत कडकडीत बंद पाळला गेला. यावेळी महाविकास आघाडीच्या वतीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करण्यात आली. खासदार ओमराजे निंबाळकर, अामदार कैलास पाटील, जीवनराव गोरे, संजय पाटील दुधगावकर, सुरेश बिराजदार, राजेंद्र शेरखाने,सक्षणा सलगर, प्रशांत पाटील, अॅड.विश्वजीत शिंदे, प्रभाकर लोंढे, मसूद शेख, नंदू घेवारे खलिल सय्यद, नितीन बागल, विजय सस्ते, अॅड. मंजूषा मगर आदींने शहरात बाईक रैली काढत बंद चे आवाहन केले. तुळजापूर तालुक्यात तामलवाडी येथे टोलनाक्यावर महाविकास आघाडीच्या वतीने रस्ता रोको करण्यात आला. उत्तम आमृतराव सुधीर कदम, अमर पोतदार, गोकूळ शिंदे, शाम पवार आदींनी भाग घेतला. 
तुळजापूर शहरात नवरात्रोत्सव सुरू असल्यामुळे भक्तांची गैरसोय होऊ नये, यामुळे सर्व व्यवहार सुरळीत चालू होते. उमरगा तालुक्यात कडकडीत बंद पाळण्यात आल्याचे सांगण्यात आले. या ठिकाणी महाविकास आघाडीचे नेते बंद करीत आवाहन करीत असल्याचे दिसून आले. लोहारा तालुक्यात बंदला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. महाविकास आघाडीचे नेते. मोहन पणुरे, सुनिल साळुंके, आविनाश माळी, जालिंदर कोकणे आदींनी शहरात बंदचे आवाहन केले होते. 
कळंब व वाशी तालुक्यात पावसाच्या पाण्यात भिजलेले सोयाबीन काढण्याकडे लोकांचा कल असल्यामुळे दुपारी एक पर्यंत बंद पाळण्यात आला.त्यानंतर व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू केली. शहर बंद करण्यासाठी महाविकास आघाडीचे पाडुरंग कुंभार, श्रीधर भवर, वाशीमध्ये प्रशांत चेडे आदींनी सहभाग नोंदविला. भूम तालुक्यात ही बंदला उत्तर प्रतिसाद मिळाला. शेतकरी विरोधी केलेल्या कायद्याची होळी करून उपजिलाधिकारी कार्यालयात निवेदन देण्यात आले. यावेळी हानमंत पाटूळे, अॅड. शिराज मोघल दिलीप शाळू, विलास शाळू, मोईज सय्यद आदींनी भाग घेतला. परंड्यामध्ये ही महाविकास आघाडीच्या वतीने बंद पुकारण्यात आला. दुपार पर्यंत बंदला चांगला प्रतिसाद मिळाल्याचे सांगण्यात आले. 
 
Top