परंडा / प्रतिनिधी : - 

घाटनांदुर तालुका भुम येथे वॉटरशेड ऑर्गनायझेशन ट्रस्ट (वॉटर ) व इंडस्इड बॅक मुंबई यांच्या तांत्रीक व आर्थीक साहयातुन सन २o१८ पासुन पाणलोट व्यावस्थापन कार्यक्रम एकुण 25 गावांमधे चालु आहे.  या मध्ये पाच विभागा मध्ये काम केले जाते. १) मृद व जल संधारण २) सामाजिक विकास ३) शेती विकास ४) महिला विकास ५ पाणी व्यावस्थापन यावरमोठ्या प्रमाणात काम केले गेले आहे. मृद जल संधारण मध्ये माथा ते पायथा काम केले जलशोषक चर (वॅट) , बांधबंदीस्थी , जाळी बंधारे , दगडी बांध  माती व पाणी  मोठ्या प्रमाणात काम झाल्या मुळे घाटनांदुर येथे पाण्याच्या पातळी वाढ झाली आहे.

सामाजिक विकासा मध्ये गावा जनजागृती करून गावकराचे संघटन केले गेले आहे. ग्रामविकास समीती व संयुक्त महीला समीती संघटन केले गेले आहे. सहल , प्रशिक्षण  घेऊ गावकराचे पाणी व माती प्रेम वाढले आहे.

महीला विकासा मध्ये बचत गाटाना प्रशिक्षण , मिटींग, सहल या माध्यमातुन संघटन उभे केले आहे. आज महीला पुढे येऊन बोलु लागल्या आहे. आरोग्य बदल माहिती देण्यात येत आहे. रोजच्या आहारासाठी भाजी पाला लागतो तो सेंद्रिय भाजीपाला पिकविण्यासाठी दहा प्रकारचे बी देण्यात आले आहे. आज प्रत्येक महीलेला ताजा सेंद्रिय भाजी पाला भेटतो. पाणी व्यावस्थापन मध्ये पाण्याचा ताळेबंद करण्यात आहे आहे. काही शेतकराना तुषार सिंचन सेट देण्यात आले. पाण्याची बचत होण्यासाठी शेतकरी वापर करत आहे. 

हे पाहाण्या साठी भारत सरकार च्या जल शक्ती मंत्रालयच्या टिम ने पाहुन समाधान व्यक्त केले  यामध्ये श्रीमती आनुराधा भाटीया , श्री अभिषक गौरव    इंडस्इंड बॅक मुंबई चे श्री आवधुत हब्बर , श्री अशिष सर , श्रीमती सोनम  डुंबरे वॉटर संस्थे  संचालक श्री हारीष डावरे , श्री गणेश राजापुरे , श्री कांतिलाल गिते उस्मानाबाद जिल्हाचे प्रोजेक्ट मॅनेजर ,श्रीमती समीना पठान   सामाजीक विकास अधीकारी , नितीन पोटे , अक्षय नागरगोजे यांनी भेट दिली. 

तसेच गावचे सरपंच  , ग्रामविकास समीती अध्यक्ष श्री बबन पवार, दत्ता माने, नवनाथ हुंबे ,हारीदास बेरगळ,भडगे , कविता माने , स्वेता वाघमोडे, सुरेखा हाळनोर व गावकरी मोठया संख्ये उपस्थीत होते.


 
Top