उस्मानाबाद / प्रतिनिधी- 

जांत पंचायत प्रकरणातील ७ आरोपींना अटक करण्यात आल्याची माहिती पुलिस विभागाच्या वतीने देण्यात आली आहे. या संदर्भात अधिक माहिती विचारण्यासाठी स्थानिक गुन्हे शाखा पोलिस निरीक्षक गजानन घाडगे यांना फोन केला असता त्यांनी एकुन १४ आरोपींना पकडल्याचे सांगितले. आहे. 

जात पंचायत प्रकरणामधील आरोपींवर स्थानिक गुन्हे शाखा : आनंदनगर पो.ठा. येथे गु.र.क्र. 275 / 2021 हा भा.दं.सं. कलम- 306, 354, 297, 268, 323, 504, 506, 34 सह महाराष्ट्र सामाजिक बहिष्कार पासुन व्यक्तींचे संरक्षण अधिनियम कलम- 5, 6, 7 अंतर्गत दि. 06 ऑक्टोबर रोजी दाखल आहे. नमूद गुन्ह्यातील आरोपींचा पोलीस शोध घेत असून गुन्ह्यातील अरोपी वसंत छगन काळे, संतोष वसंत काळे उर्फ बप्पा, नामदेव वसंत काळे, (तीघे रा. डिकसळ, ता. कळंब ),शहाजी राजेंद्र पवार, संजय कालिदास काळे, बजरंग मोतीराम चव्हाण, बप्पा मोतीराम चव्हाण, चौघे (रा. दत्तनगर, ढोकी)  यांना स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने  दि. 10 ऑक्टोबर रोजी डिकसळ व ढोकी शिवारातून अटक केली असून पुढील कार्यवाहिस्तव आनंदनगर पो.ठा. च्या ताब्यात दिले असून गुन्ह्यातील त्यांच्या अन्य साथिदारांचा पोलीस शोध घेत आहेत. 

 
Top