पुणे / वृत्तसंस्था-

 शासकीय सेवेत पदोन्नती मिळालेले अधिकारी, यूपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेले विद्यार्थी व कोविड मध्ये उत्कृष्ट काम करणार्‍या कोविड योद्धा सन्मान सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला.

सदर कार्यक्रम रविवार, दि. ०३/१०/२०२१ दुपारी २.३० वा.अल्पबचत भवन, विधान भवनाच्या पाठीमागे, पुणे. येथे संपन्न झाला. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी सोलापूरचे पालकमंत्री तथा राज्याचे राज्यमंत्री मा. ना. दत्तात्रय भरणे होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून खासदार पद्मश्री डॉ. विकास महात्मे, अतिरिक्त जिल्हाधिकारी सोनाप्पा यमगर, नाशिकचे पोलिस अधीक्षक (उत्पादन शुल्क) मनोहर अंचुले, DCP राहुल श्रीरामे, राज्यकर उपायुक्त राजेंद्र कुर्‍हाडे, ACP रुक्मिणी गलांडे, पुण्यश्लोक फाऊंडेशनचे अध्यक्ष  धनंजय तानले यांच्यासह मुंबई, पुणे, औरंगाबाद, नाशिक , कोल्हापूर तसेच इतर शहरातील अधिकारिसह कर्मचारी वर्ग मोठ्या प्रमाणात उपस्थित होता.

यावेळी मंत्रालयात उपसचिव म्हणून पदोन्नती मिळवलेले दादासाहेब, खताळ, प्रताप लुबाळ व संतोष गावडे यांचा दणकेबाज सत्कार उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला . नुकत्याच यूपीएससी मध्ये उत्तीर्ण झालेल्या दिव्या गुंडे, स्नेहल ढोके, यांचाही उचित सत्कार मंत्री महोदय व उपस्थित मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला तर रजत कुंडगिर व श्रीकांत मोडक यांच्या पालकांनाही सन्मानित करण्यात आले. तसेच कोरोना सारख्या महामारीच्या काळात आपला जीव धोक्यात घालून काम करणार्‍या मा. राहुल श्रीरामे, पोलिस उपायुक्त, पुणे. मा. नंदकुमार सोरटे, राज्यकर उपायुक्त,  पुणे., डॉ. संजय वावरे, सहाय्यक आरोग्य अधिकारी, पुणे महानगरपालिका, डॉ. लक्ष्मण गोफणे , सहाय्यक आरोग्य अधिकारी, पिंपरी चिंचवड महानगरपालिका, डॉ. शोभा गावडे, तहसिलदार, मा. दत्तात्रय गाढवे, मोटर वाहन निरीक्षक, पुणे. , श्रीमती. सुनिता धनगर, शिक्षणाधिकारी- महानगरपालिका नाशिक , श्रीमती. स्नेहा शितल चंदन, अधिसेविका, राजावाडी हॉस्पिटल, मुंबई, मा. रमेश सुळ , सहाय्यक अभियंता, महावितरण , मा. रमेश माने, प्रशासकीय अधिकारी, आरोग्य विभाग, महाराष्ट्र शासन , मा. दत्तात्रय सोलणकर, स्थानिक निधी लेखापरीक्षक, सातारा, मा. अशोक बंडगर, वरिष्ठ आरोग्य निरीक्षक, पुणे महानगरपालिका  उपजिल्हाधिकारी सुभाष घुले, डॉ श्वेता गाडेकर, डॉ दिनेश गाडेकर सह अनेकांना कोरोंना योद्धा म्हणून सन्मानित करण्यात आले. तर युवा उद्योजक, विवेक बिडगर व मारुती येडगे यांच्यासह मंत्रालयातील अधिकारी काशीबाइ थोरात यांचा विशेष सन्मान करण्यात आला.

कार्यक्रमाचे प्रस्ताविक पुण्यश्लोक फाऊंडेशनचे अध्यक्ष  धनंजय तानले यांनी केले. आभार गणेश खामगळ यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी संस्थेचे उपाध्यक्ष भुजंग दूधाळे, सचिव राजेंद्र गाडेकर, सदस्या रुक्मिणी धर्मे, दीप्ती ताणले, सागर सुरवसे, प्रवीण ताणले, सागर खटके, आदींनी केले. 

 
Top