उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कळंब तालुक्यातील शिराढोण येथील सर्वे न. २१४ मधील दोन गुंठे दिलेली जागा शासनाने पंचनामा करुन अतिक्रमणामध्ये काढलेली जागा परत मिळण्याच्या मागणीसाठी भिमा रामा गाडे (माजी सैनिक) हे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपाेषण करीत आहेत. या उपोषणाचा आज सोमवार दि. ४ ऑक्टोबर रोजी दुसरा दिवस आहे. तरी प्रशासनाने त्यांच्या मागणीकडे अद्याप दुर्लक्ष केले आहे. तरी जिल्हाधिकारी यांनी या विषयाकडे लक्ष देऊन वरील मागणी मान्य करून न्याय दयावा, अशी मागणी उपोषणकर्ते माजी सैनक भिमा गाडे यांनी केली आहे. 


 
Top