तुळजापूर / प्रतिनिधी-

 येथील वेताळनगर भागातील २५ वर्षीय युवकाने वेताळनगर मधील स्मशानभुमीतील झाडास गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना रविवार दि.३रोजी दुपारी बारा वाजण्याचा सुमारास घडली. सदरील आत्महत्या चे कारण समजू शकले नाही

शहरातील वेताळनगर भागातील अमर अविनाश रसाळ (२५) याने आपल्या घराजवळ असणाऱ्या स्मशान भूमीतील शिवरीच्या झाडास गळफास घेऊन आत्महत्या केली. या घटनेचा पोहेका विजय राठोड, पोना महादेव सुडके यांनी पंचनामा केला. 

 या प्रकरणी दुष्यंत अभिमन्यु रसाळ यांनी दिलेल्या फिर्याद वरुन पोलिसांनी अकस्मात मुत्यु म्हणून गुन्हा नोंद केला असुन पुढील तपास हे काँ राठोड करीत आहेत.


 
Top