उस्मानाबाद / प्रतिनिधी- 
महाराष्ट्रातील शेतकरी व सामान्य जनता संकटांमध्ये होरपळत असताना, उत्तर प्रदेशातील जनतेचे तारणहार असल्याच्या आविर्भावात मंत्रिमंडळाच्या बैठकीत शोकप्रस्ताव संमत करणे ही ठाकरे सरकारची निव्वळ ढोंगबाजी आहे. एक हजार पन्नास कोटींच्या दलालीचे पुरावे आयकर खात्याला सापडल्याने लखीमपूर प्रकरणाच्या ढालीआडून महाराष्ट्र बंद पुकारून या गंभीर प्रकरणावरून जनतेचे लक्ष अन्यत्र वळविण्याचे हीन राजकारण ठाकरे सरकार करत आहे, असा आरोप भाजपचे नितीन काळे यांनी  केला. उत्तर प्रदेशातील शेतकऱ्यांविषयी कळवळा दाखविणाऱ्या ठाकरे सरकारने महाराष्ट्रातील संकटग्रस्त शेतकऱ्यांना वाऱ्यावर का सोडले, असा सवालही त्यांनी केला.
   व्यापारी महासंघाने केले आवाहन
उस्मानाबाद जिल्हा व्यापारी महासंघाचे अध्यक्ष संजय मंत्री यांनी गेल्या दोन वर्षांपासून कोरोनामुळे व्यापार थंडावला आहे. तरी सुध्दा आज महाविकास आघाडीच्याव वतीने बंदचे आवाहन केले. त्याला प्रतिसाद म्हणून दुपारी एक पर्यंत व्यापाऱ्यांनी बंद मध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन केले होते. त्या प्रमाणे व्यापाऱ्यांनी बंद ठेवला होता. यावेळी लक्ष्मीकांत जाधव आदी उपस्थित होते. 

 
Top