उस्मानाबाद / प्रतिनिधी-

जिल्ह्यात १८ वर्षावरील वयोगटासाठी कोविड-१९ प्रतिबंधात्मक लसीकरण सुरु आहे. मात्र, अद्यापही अनेक तरुण तरुणींचे लसीकरण बाकी आहेत. महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचे लसीकरण शंभर टक्के होण्यासाठी २५ आॅक्टाेबर ते २ नोव्हेंबर दरम्यान महाविद्यालयात मिशन युवा स्वास्थ्य मोहीम सुरु केली.

जिल्ह्यात १८ ते ४४ वर्ष वयोगटातील ४२.७६ % लाभार्थींनी पहिला डोस तर ९.१० टक्के लाभार्थींचे दोन्ही डोस झाले. त्यामुळे अद्यापही मोठ्या प्रमाणात तरुण मुला-मुलींचे लसीकरण बाकी आहे. हा वयोगट अत्यंत क्रियाशील असल्याने त्यांना कोरोनाचा संसर्ग होण्याचा धोका अधिक आहे. त्यामुळे या वयोगटाचे लसीकरण करण्यावर भर देण्यात येत आहे. यात लसीकरणासाठी विशेष सत्र आयोजित करणार आहेत. तसेच अद्याप लस न घेतलेल्या सर्व विद्यार्थी, महाविद्यालयीन प्राध्यापक, अधिकारी आणि कर्मचारी यांचेही लसीकरण करण्यात येणार आहे. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी लसीकरण करुन घेण्याचे आवाहन सार्वजनिक आरोग्य विभाग, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर आणि मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद राहुल गुप्ता यांनी केले.

 
Top