परंडा / प्रतिनिधी : -

महावितरण शाखा शेळगाव आणि अनाळा चे अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी केली मोठी कारवाई शेळगाव- उस्मानाबाद जिल्ह्यातील परांडा सबडीव्हीजन मधील शेळगाव आणि आनाळा शाखेतील वीज चोरीचे प्रमाण प्रचंड वाढले असल्याचा पुरावाच महावितरणाला मिळाल्याने.  एकाच दिवशी अनेक ठिकाणी अचानक तपासणी केली असता बऱ्याच ठिकाणी वीजचोऱ्या आणि विजेचा अनधिकृत वापर उघडकीस आला. अशा वीजचोरांकडून एका दिवसात तब्बल लाखो रुपयांचा दंड वसूल करण्यात येणार आहे.

बिलांचा भरणा न करणाऱ्या वीज चोरांविरुद्ध भारतीय विद्युत कायदा 2003 अन्वये कलम 135 नुसार फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.

लातूर प्रादेशिक विभागात वितरण व वाणिज्यिक हानी कमी करण्यासाठी वीजचोरीविरुद्ध नियमित कारवाई सुरू आहे. सोबतच वीजचोरांविरुद्ध कठोर कारवाई करण्यासाठी प्रादेशिक संचालक यांच्या निर्देशानुसार एक दिवसीय विशेष मोहीम घेण्यात येत आहे.

उस्मानाबाद जिल्ह्यांमध्ये एकाच वेळी शेकडो अभियंता व कर्मचाऱ्यांनी विविध पथकांद्वारे वीजचोरीविरोधात कारवाई सुरु केली आहे. यामध्ये दिवसभरात  जिल्ह्यातील घरगुती, वाणिज्यिक, औद्योगिक, कृषी आदींच्या हजारो वीजजोडण्यांची तपासणी करण्यात येत आहे. यामध्ये शेकडो ठिकाणी वीजचोऱ्या व अनधिकृत वीजवापर आढळून आला. या मोहिमेत सुमारे लाखो युनिटची वीजचोरी झाल्याचे प्राथमिक तपासणी दिसून आले त्याची वसुली करण्यासाठी विज चोरीचे बिल संबंधीत ग्राहकांना देण्यात येत आहेत. नियमाप्रमाणे दंड व वीजचोरीचे बिल न भरल्यास फौजदारी कारवाई करण्यात येणार आहे.  वीजबिलांच्या थकबाकीमुळे खंडित केलेला वीजपुरवठा परस्पर जोडून घेत किंवा अन्य ठिकाणाहून वीजवापर करणाऱ्या ग्राहकांविरुद्ध सुद्धा या मोहिमेत फौजदारी कारवाई करण्यात आली.

 ही वीजचोरी महावितरण विशेष वीजचोरी पथक शेळगाव शाखेचे अभियंता श्री. एस. एम. राजपूत साहेब, आनाळा शाखेचे अभियंता श्री. बी. ए. नागरगोजे साहेब, उस्मानाबाद विभागाचे श्री. ए. जे जाधव साहेब.तसेच शेळगाव चे वरिष्ठ तंत्रज्ञ गोकुळ डोके,कनिष्ठ तंत्रज्ञ सचिन हिंगणकार, बाहेश्रोत कर्मचारी नानासाहेब केत,बालविर शिंदे,रमजान मोगल, समीनदार, भोगील, व आनाळा शाखेचे कर्मचारी वरिष्ठ तंत्रज्ञ श्री चोरगे, वरीष्ठ तंत्रज्ञ जाधव ,बाह्यश्रोत कर्मचारी चव्हाण, खर्डे, टिकोरे यांच्या उपस्थितीत वीजचोरी कारवाई करण्यात आली.


 
Top