तुळजापूर  / प्रतिनिधी- 

कोरोना  संकट अचानक उद्भवल्याने या कालावधीत मुखमंञी उध्दव ठाकरे यांना बाहुबली नायकाची भूमिका बजावावी लागली असे स्पष्ट करुन कोरोना काळात केंद्राची एकाधिकारी शाही वाढल्याची माहीती विधानमंडळ उपसभापती निलम गोरे यांनी तुळजापूरात पञकार परिषदेत दिली.

बुधवार दि.२७ रोजी विधानपरिसषद उपसभापती निलम गोरे यांनी तिर्थक्षेञ  तुळजापूरात येवुन देवीदर्शन घेतले देवीदर्नशना नंतर शासकीय विश्रामधाम येथे पञकाराशी बोलताना म्हणाल्या की, कोरोना काळातील बाधीत घटकांचा आढावा आम्ही घेत आहोत. कोरोना हाताळताना केंद्राची एकाधिकार शाही वाढल्याचा आरोप यावेळी केला .कोरोना काळात विधान मंडळाचे अधिवेशन जरी घेतले गेले नसली तर या काळात व्हीडीओ काँन्स्फरसिंग व्दारे ज्या प्रश्नांची दखल घ्यायची होती ती घेतल्याचे यावेळी स्पष्ट केले.

यावेळी सेनेच्या शामलताई पवार शाम पवार , सुधीर कदम, सुरेखा मुळे, बाळासाहेब शिंदे, चेतन बंडगर,अर्जून सांळुके, सागर इंगळे आदी उपस्थित होते. 

 
Top