कळंब / प्रतिनिधी : -

दोन घरफोड्या व आठवडी बाजारातून मोबाइल चोरीतील दोघांना संभाजीनगर (डिकसळ) येथून अटक केली. कळंब पोलिसांनी मंगळवारी सकाळी आरोपी दीपक विलास पवार (२१) याला पकडून घराची झाडाझडती घेतली. यात अंगणवाडी डिकसळ येथून ६५०० रुपयांचे चोरीला गेलेले तीन गॅस सिलिंडर, भांडी असा ९५०० रुपयांचा मुद्देमाल, मोबाइल मिळाला. बाजारातून कृष्णा वैजनाथ कदम याने चोरल्याचे समोर आले. दोघांनाही अटक केली. पोलिस निरीक्षक यशवंत जाधव, सुनील कोळेकर, फरहान पठाण आदींचा सहभाग होता.


 
Top