उस्मानाबाद / प्रतिनिधी-

विभागीय सहनिबंधक,सहाकरी संस्था,लातूर यांच्याकडून 250 पर्यंत किंवा त्यापेक्षा कमी सभासद संख्या असलेल्या सहकारी गृहनिर्माण संस्थांच्या निवडणुका घेण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी यांची नामतालिका (पॅनेल) तयार करण्यात येणार आहे.पात्र अधिकाऱ्यांनी 01 नोव्हेंबर 2021 पर्यंत अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा उपनिबंधकसह संस्था यांनी केले आहे.

 शासकीय विभागातील,स्थानिक स्वराज्य संस्थेतील,सहकारी संस्थेतील कायम कार्यरत अधिकारी,कर्मचारी (वरिष्ठ लिपीक किंवा त्यापेक्षा जादा दर्जा असलेल्या कर्मचारी), प्रमाणित लेखापरीक्षक,वकील (पाच वर्षाचा कामाचा अनुभव) शासकीय सेवतून,स्थानिक स्वराज्य संस्थेतून सेवानिवृत्त झालेला अधिकारी,कर्मचारी (वयाची 65 वर्ष पेक्षा जास्त नसेलेला) यांच्याकडून विहित नमुन्यातील अर्ज मागविण्यात येत आहेत.हा अर्ज दि.01 नोव्हेंबर-2021 पर्यंत (शासकीय सुट्टीचे दिवस वगळून) संबंधित जिल्हा उपनिबंधक,सहाकरी संस्था यांच्या कार्यालयात कार्यालयीन वेळेत स्वीकारण्यात येणार आहेत.

 याबाबतचे जाहिर निवेदन,विहित नमुन्यातील अर्ज,अर्टी,शर्ती जिल्हा उपनिबंधक,सहकारी संस्था, उस्मानाबाद यांच्या कार्यालयातील नोटिस बोर्डावर डकविण्यात आले आहे. त्याप्रमाणे इच्छुकांनी अर्ज करावेत,असे आवाहन जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था यांनी केले आहे.


 
Top