उस्मानाबाद / प्रतिनिधी-

मौ.भातंबरे ता.बार्शी जि.सोलापूर येथील शिवगर्जना ग्रुप व ग्रामस्थांचे वतीने शिवराज्याभिषेक सोहळा समितीचे नुतन पदाधिकारी यांचा सत्कार समारंभ आयोजित करण्यात आला होता. समितीचे अध्यक्ष श्री शशिकांत खुने यांचा सत्कार श्री शंकर खुने यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व फेटा बांधून त्याचा सत्कार केला. तसेच समितीचे नुतन उपाध्यक्ष श्री धर्मराज सुर्यवंशी यांचा सत्कार अॅड. संजय खुने यांनी शाल श्रीफळ पुष्पगुच्छ देऊन व फेटा बांधून त्यांचा सन्मान केला.तसेच समितीचे नुतन सचिव श्री दत्तात्रय साळुंके यांचा सत्कार श्री हनुमंत देवकते यांचे हस्ते फेटा बांधून पुष्पगुच्छ देऊन आदर सत्कार करण्यात आला.

 यावेळी हलगी, ढोल,ताशे,फटाक्यांच्या दणदणाटांत समितीचे नुतन पदाधिकारी यांची मिरवणूक काढण्यात आली.यावेळी समितीचे नुतन पदाधिकारी श्री.रवी मुंडे, सुनिल मिसाळ, निशिकांत खोचरे, अच्युत थोरात, धनंजय साळुंके, नितीन वीर,आनंद जाधव, रियाज शेख, मच्छिंद्र कांबळे यांचाही सत्कार करण्यात आला. यावेळी समितीचे गुंडोपंत जोशी गुरूजी, संजय शिंदे, महमूद शेख, प्रतापसिंह काकडे, संजय बागल,मेजर अमृत खुने,सागर मोहिते, महेश खुने,समाधान सिरसट, सचिन खुने,काकासाहेब उघडे,शंकर खुने,ओंकार देवकते, संदिप खुने,सोमनाथ खुने,हनुमंत देवकते, भारत खुने,श्रीराम मदने,लखन जाधव, अतुल पाटील, स्वप्निल पाटील, महादेव मोहिते, बालाजी पवार, पप्पू खुने,सादिक मुलानी इ.कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top