उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद जिल्ह्याला ऐतिहासिक असा पर्यटन साहित्य सांस्कृतिक वारसा लाभलेला आहे,अगदी खाण्याचे पदार्थ देखिल नावाजलेले असुन उस्मानाबाद चे गुलाब जामुन, सरमकुंडीचा खवा पेढा, उस्मानाबादी शेळीचे मटन, येरमाळा मच्छी, पाटोदा येथील बासुंदी,अशी खाद्य पर्यटन ची शृंखलाच इथे आहे. यापैकी एक उस्मानाबादच्या गुलाब जामुन ला ऐतिहासिक असे महत्व प्राप्त आहे. यात महत्वपूर्ण योगदान असलेल्या निचलकर परिवाराचे हॉटेल उस्मान गेल्या पन्नास वर्षांपासून सातत्याने दर्जेदार गुलाब जामुनची विक्री मोठ्या प्रमाणात करत आहेत.अगदी शहरातच नव्हे तर जिल्ह्यात, महाराष्ट्र राज्य बाहेर दिल्लीपर्यंत गुलाब जामूनची ख्याती पसरली आहे.हाॅटेल उस्मानच्या गुलाब जामून व्यवसायाला पन्नास वर्षाची कारकिर्द पुर्ण झाल्याने या निमित्ताने पाच दिवस गुलाब जामून महोत्सव आयोजित करून ना नफा ना तोटा तत्वावर शंभर रुपये किलो दराने गुलाब जामुन पर्वणी खवैय्यांसाठी उपलब्ध करून दिली. या महोत्सवात दहा हजार किलो गुलाब जामुन ची विक्री झाली. गुलाब जामुन हा उस्मानाबाद पर्यटन विकास समितीचा एक भाग असल्यामुळे या महोत्सव आयोजनाबद्दल निचलकर परिवाराचा उस्मानाबाद पर्यटन विकास समिती तर्फे सत्कार करण्यात आला. यावेळी उस्मानाबाद पर्यटन विकास समितीचे अध्यक्ष युवराज नळे,अब्दुल लतिफ,अक्षय ढोबळे,गणेश रानबा वाघमारे,बाबा गुळीग,दिपक पांढरे,धर्मवीर कदम, मुकेश नायगावकर, रविंद्र शिंदे, शशिकांत सुर्यवंशी, सुनिल शिंदे, अब्दुल भाई,सलीम शेख अन्य इतर मान्यवर उपस्थित होते.

 
Top