भूम / प्रतिनिधी : - 

भूम नगर परिषदच्या वतीने ग्रामदैवत अलमप्रभु देवस्थान बायपास रोड, समर्थ नगर अंतर्गत डांबरीकरण रस्त्याचे शुभारंभ करण्यात आला

अलमप्रभु ग्रामदैवत असल्याने मराठवाडा भरातून भाविक येत असतात देवस्थांकडे जाणार रस्ता उस्मानाबाद रोड ते अलमप्रभु असा रस्ता 51 लाख रु विकास निधी रस्त्यासाठी वापरण्यात येणार आहे तर समर्थ नगर प्रभाग अंतर्गत डांबरीकरण साठी 65.68  लक्ष रु,अंतर्गत नाली व पेव्हर ब्लॉक साठी 72.68 लक्ष, इतर पेव्हर ब्लॉक साठी 72.38लक्ष रु विकास निधी वापरण्यात येणार आहे, रस्त्याच्या उद्घाटनसाठी त्या प्रभागातील जेष्ठनागरिक व तारुणांच्या हस्ते करण्यात आला तर अलमप्रभु बायपास रस्त्याचे कामाची सुरुवात मंदिर ट्रस्ट व पुजारी यांच्या हस्ते करण्यात आले.

या प्रसंगी विधिज्ञ संजय शाळू, नगरसेवक संदीप मोटे, संजय पवार, किरण जाधव सर, सागर टकले नप अभियंता गणेश जगदाळे, जायबाहे, तुकाराम माली, माऊली टकले,रईस काजी, रहीम सौदागर, एम आय एम अध्यक्ष काजी, बाळासाहेब अंधारे, मामु जमादार, मुशीर शेख, रामेश्वर भोईटे तात्या ,मनोज शेळके,प्रदीप चौधरी, सचिन मुळे आदी नागरिक उपस्थित होते

 
Top