परंडा / प्रतिनिधी : - 

केंद्रयमंत्री रामदास आठवले यांच्या आदेशानुसार परंडा तहसील कार्यालयावर रिपब्लिकन पक्षाचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे यांच्या नेतृत्वाखाली निदर्शने करुन तहसिलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री यांना विविध मागण्याचे निवेदन देण्यात आले.

रिपब्लिकन पक्षाच्या वतीने महाराष्ट्रात सर्व जिल्हा तालुका यांच्या वतीने विविध मागण्यासाठी आंदोलन करण्यात आले आहे. त्याबरोबरच परंडा तालुका आठवले गट यांच्या वतीने निदर्शने करून तहसीलदार यांच्या मार्फत राज्याचे मुख्यमंत्री उद्धवजी ठाकरे यांना खालील मागण्याचे  निवेदन देण्यात आले.

मागण्या पुढीलप्रमाणे आगामी होणा-या महानगर पालिका ,नगरपरिषद ,नगरपंचायत च्या प्रभाग  पध्दती बंद करण्यात यावी, ओला दुष्काळ जाहीर, शेतकऱ्यांना प्रती हेक्टरी पन्नास हजार मदत, मराठा समाजाला आरक्षण देण्यात यावे,ओबिसी समाजाला आरक्षण देण्यात ,अॅट्रसिटी कायद्याची कडक अमलबजावणी करावी, गायरान जमिनि तात्काळ नावे करावे असे दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.

यावेळी निवेदनावर रिपब्लिकन पक्षाचे राज्य चिटणीस संजयकुमार बनसोडे , ता.अध्यक्ष फकिरा दादा सुखसे , युवक तालुकाध्यक्ष आकाश बनसोडे संपर्क प्रमुख दादा सरवदे ,आय टी सेल उस्मानाबाद जिल्हा संपर्कप्रमुख तानाजी सोनवणे , जेष्ठ नेते उत्तम ओव्हाळ, विकास गोमासे तालुका सरचिटणीस दिपक ठोसर , दिपक ओव्हाळ, बाबा शिंदे . शाम गायकवाड, आण्णा , चालक मालक संघटना अध्यक्ष आण्णा वाघचौरे , धनाजी , यशवंद भास्कर ओव्हाळ, हरिभाऊ अडांगळे ,काशिनाथ सातपुते संजिवन भोसले , हनुमंत प्रतापे , चंद्रकांत परिहार ,आणा दाभाडे आकाबाई शेंडगे आदी पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.


 
Top