उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 ❝धाराशिव साखर कारखाना लि.चोराखळी❞ १०व्या गळीत हंगामाचा “बाॅयलर अग्निप्रदिपन” ह.भ.प. श्रीगुरू अनिल महाराज पाटील बाभूळगांवकर यांच्या शुभहस्ते करण्यात आले. बाॅयलर अग्निप्रदिपन पुजेस कारखान्याचे संचालक भागवत चौगुले, त्यांच्या सुविद्य पत्नी सौ.कविता चौगुले यांच्या हस्ते होमहवन पुजा करण्यात आली दिवाळीसाठी १५ दिवसाचा पगार बोनस तर  ६७१ ऊस लागवडीस १००रू भाव जास्त देणार असल्याची माहिती धाराशिव साखर कारखान्याचे चेअरमन अभिजीत पाटील यांनी दिली. 

याप्रसंगी  मनसेचे नेते दिलीप धोत्रे, धाराशिव साखर कारखान्याचे कार्यकारी संचालक अमर पाटील, संचालक सुरेश सावंत, संतोष कांबळे, रणजीत भोसले, विकास काळे, दिपक आदमिले, सुहास शिंदे, सजंय खरात, आदीची उपस्थिती होती. 

ह.भ.प. श्रीगुरू अनिल महाराज पाटील बाभूळगांवकर यांच्या हस्ते अग्निप्रदिपन करण्यात आले. यावेळी चेअरमन अभिजीत पाटील म्हणाले की, १३६ रुपये हप्ता लवकरच शेतकरी बांधवांच्या खात्यावर जमा करण्यात येईल.तसेच कर्मचाऱ्यांची हि दिवाळी गोड व्हावी याकरिता दिवाळीसाठी कामगारांना १५ दिवसाचा पगार बोनस म्हणून देण्याचे जाहीर केले.याप्रसंगी चोराखळीचे सरपंच खंडेराव मैदांड, मा.सरपंच बाबा साठे, केजचे सुरेश पाटील, सरपंच चरणेश्वर पाटील, बाबासाहेब पाटील, पंढरपूरचे प्रा.तुकाराम मस्के, पोपट पवार, चंद्रभागा सहकारी साखर कारखान्याचे संचालक तुकातात्या मोरे, उमेश मोरे, गणेश ननवरे,पोपट घाडगे, महेश जावळे, समीर शेख, रणजीत तनपुरे,  कारखान्याचे जनरल मॅनेजर गायकवाड, प्रवीण बोबडे, शेती अधिकारी गव्हाणे, तांबारे, रवी लिंगे यासह अधिकारी वर्ग, कर्मचारी यांच्या उपस्थित पार पडला. 

कार्यक्रमाचे प्रास्ताविक कारखान्याचे संचालक दीपक आदमिले यांनी केले.व कार्यकारी संचालक अमर पाटील यांनी कार्यक्रमाची सांगता समारोप केला.


 
Top