तुळजापूर / प्रतिनिधी-

श्री तुळजाभवानी प्रक्षाळ चॅरिटेबल ट्रस्ट व विशाल   रोचकरी मित्र मंडळ यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आलेल्या मोफत आयुर्वेदिक न्युरोथेरेपी मेडिकल शिबिरात 3132 नागरिकांची मोफत तपासणी करण्यात आली,

 यावेळी देविचे मंहत  वाकोजीबुवा , तहसीलदार सौदागर तांदळे, पोलीस निरीक्षक आदिनाथ काशीद,  माजी उपनगराध्यक्ष बाळासाहेब  शिंदे बाळासाहेब   हंगरगेकर ,अनिल (दादा) शिंदे ,आनंद कुलकर्णी,नगरसेविका अश्‍विनी रोचकरी,  तुळजाभवानी पुजारी मंडळाचे उपाध्यक्ष विपिन शिंदे, संचालक प्रा. धनंजय लोंढे ,माजी नगरसेवक अमर (दाजी) हंगरगेकर, राजेश शिंदे, श्याम प्रसाद लोहिया, डॉक्टर नरसिंह स्वामी मामडयाल, डॉक्टर नागेश आकेन, संतोष जाधव, वंदना मामड्याल, निशा आकेन, अश्विनी शिंदे, ज्योती सावंत, वैशाली धरणे, लक्ष्मी हंगरगेकर, आनंत सावंत उपस्थित होते. योग मास्टर विठ्ठल मामा जाधव , प्रा. लोंढे, विपिन शिंदे, डॉ. नरसिंह स्वामी, अॅड. शिवजी रोचकरी यांनी आपले विचार व्यक्त केले.   सुत्रसंचलन महेंद्र कावर  यांनी केले .  शिबिरातील लाभार्थी बापू  मगर यांनी  संयोजकांचे आभार व्यक्त केले. 

  शिबिरात सहभागी सर्व डॉक्टर व कर्मचारी यांचा सत्कार विशाल  रोचकरी मित्र मंडळाच्या वतीने  देवीची प्रतिमा देऊन करण्यात आला. शिबिर यशस्वी करण्यासाठी आनंद सावंत, बाळासाहेब रोचकरी, नानासाहेब लोंढे ,बाबा खपले, विजय काकडे, किरण आवताडे ,विशाल गंगणे ,बाळू गुरव यांनी परिश्रम घेतले.

 
Top