उमरगा/ प्रतिनिधी : -

 तालुक्यातील येळी परिसरात रविवारी (दि.२४) रात्री साडेदहाच्या सुमारास उपविभागीय अधिकारी रमेश बरकते यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक मुकुंद आघाव यांच्या पथकाने बायोडिझेल विक्री धंदयावर धाड टाकली. या कारवाईत अवैद्यरित्या विक्री करताना एका ट्रकसह २३ लाख ६७ हजार १६० रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. याप्रकरणी पाच आरोपीवर उमरगा पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले आहे. तर उर्वरित तीघांना अदयाप अटक करण्यात आलेली नाही.

तालुक्यातील  येळी शिवारात अब्दूल रशीद शेख यांच्या शेतात ३ हजार लिटर बनावट डिझल सदृश्य इंधन एकूण किंमत २ लाख ६७ हजार रुपये, २ हजार लीटरच्या १३ व अडीच हजार लिटरच्या ३ अशा एकुण १६ टाक्या ज्याची एकूण किंमत ८६ हजार व २ इलेक्ट्रीक मोटारी किंमत २० हजार रुपये, डिस्पेंसरी मशीन किंमत १० हजार रुपये, जनरेटर किंमत १९ हजार रुपये, एक ट्रक ( के ए ५६-५६६५ ) २० लाख रुपये असे एकूण २३ लाख ६७ हजार १६० रुपयांचे  साहित्य जप्त केले. यावेळी घटनास्थळी इंधन विक्री करताना तिपण्णा कमलाकर पिलमगोले रा. कांबळेवाडी बसवकल्याण, रविंद्र आडीवाप्पा चंदनखेरे, होस्पेटगल्ली बसवकल्याण या दोन आरोपींना ताब्यात घेण्यात आले. तर तीन आरोपींना अद्याप अटक झाली नसल्याचे पोलिसांनी सांगितले. या कारवाई पथकात पो.उ.नी विकास दांडे, हेड कॉन्स्टेबल संजीवन शिंदे, पो.कॉ कांतू राठोड, पो.कॉ.माधव बोइनवाड होते.

 
Top