उमरगा / प्रतिनिधी-

कोरोनाच्या काळात रक्ताची आवश्यकता भासत असल्याने मंगळवारी (दि २६) संपूर्ण महाराष्ट्रात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले. याच अनुषंगाने उस्मानाबाद जिल्हा आर्य वैश्य महासभेच्या उमरगा शाखेच्यावतीने श्रीकृष्ण रक्तपेढी येथे रक्तदान शिबिर घेण्यात आले.

भारतीय जनता पक्षाचे तालुकाध्यक्ष कैलास शिंदे, शिवसेना तालुकाप्रमुख बाबूराव शहापुरे यांच्या हस्ते फित कापून शिबिराचे उद्घाटन करण्यात आले. या वेळी आर्य वैश्य महा सभेचे जिल्हाध्यक्ष प्रा. तुकाराम माणिकवार, प्राचार्य डॉ. दिलीप गरूड, अनिल केशवट्टी, मनीष माणिकवार, सुरेश माणिकवार आदी उपस्थित होते. आर्य वैश्य समाजाच्या वतीने रक्तदान शिबिर आयोजन करण्यात आल्याची घटना अपवादात्मक असल्यामुळे याचे कौतुक करण्यात येत आहे. शिबिरात २५ रक्तदात्यांनी रक्त देवून सामाजिक बांधिलकी जोपासली. यावेळी बोलताना कैलास शिंदे म्हणाले की, तालुक्यात आर्य वैश्य समाजाचे कार्य उल्लेखनीय असून यासाठी युवक सामाजिक बांधिलकी जोपासुन अनेक उपक्रमाचे सातत्याने आयोजन करतात. रक्तदान शिबिर यशस्वी होण्यासाठी अध्यक्ष प्रा. माणिकवार, उपाध्यक्ष कृष्णहरी वासगी, कोषाध्यक्ष विजय केशवशेट्टी, राजेंद्र केशवशट्टी, उज्वला माणिकवार, पुजा माणिकवार, गिता केशवशेट्टी यानी पुढाकार घेतला. प्रा अभयकुमार हिरास यांनी सूत्रसंचलन केले. पत्रकार बालाजी माणिकवार यांनी आभार मानले.


 
Top