तेर  / प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथे राज्याचे सांस्कृतिक मंत्री अमित देशमुख यांनी अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या सोयाबीन व पडलेल्या घराची पाहणी केली.

यावेळी अमित देशमुख म्हणाले की, अतिवृष्टीनेे  नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना आर्थिक मदत झाली पाहिजे हीच राज्य शासनाची भूमिका असल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. यावेळी आ. कैलास पाटील, जिल्हाधिकारी कौस्तुभ दिवेगावकर, तहसीलदार गणेश माळी, मंडळ अधिकारी अनिल तीर्थकर, तेरचे तलाठी प्रशांत देशमुख, तेरचे सरपंच नवनाथ नाईकवाडी,उपसरपंच रविराज चौगुले,ग्रामविकास अधिकारी प्रशांत नाईकवाडी, कानिफनाथ देवकुळे, श्रीमंत तेरकर ,शिवाजी चौगुले, अन्सार मासुलदार, चंद्रकांत माळी , धीरज पाटील, लक्ष्मण सरडे, राजाभाऊ शेरखाने, कृषी सहाय्यक कुमोद मगर आदी उपस्थित होते. अमित देशमुख यांनी शेतामध्ये जाऊन अतिवृष्टीने नुकसान झालेल्या सोयाबीनची पाहणी केली तसेच अतिवृष्टीने पडलेल्या घराची पाहणी केली.

 
Top