वाशी / प्रतिनिधी- 

कर्मवीर मामासाहेब जगदाळे महाविद्यालय वाशी, एन.सी.सी, एन.एस.एस व तालुका विधी समिती वाशी यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांच्या जयंती निमित्त्त ‘भारतभर जागरूकता व पोहच कार्यक्रम’ दिनांक ०२ ऑक्टोबर ते १४ नोव्हेंबर २०२१ या सप्ताहचे आयोजन करण्यात येणार आहे.   या कार्यक्रमाचे उद्घघाटन राष्ट्रपिता महात्मा गांधी व लाल बहादूर शास्त्री यांना अभिवादन करून  वाशी न्यायालयाचे न्यायाधीश संजय कोळेकर, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र कठारे, वाशी पोलीस उपनिरीक्षक पवन निंबाळकर यांच्या हस्ते वाशी शहरातून रॅली काढून करण्यात आले. यानंतर महाविद्यालयात हा कार्यक्रम संपन्न झाला.  

न्यायाधीश संजय कोळेकर यांनी सांगितले कि, नागरिकांना कायद्याचे ज्ञान माहिती असणे गरजेचे आहे, गुन्हेगारीने केल्याने स्वतःचे नाही तर आपले कुटुंब व भविष्याचे नुकसान होते. त्यामुळे प्रत्येक नागरिकांनी ठरवले पाहिजे कि आपण एक चांगला नागरिक होऊ. त्यासाठी ‘भारतभर जागरूकता व पोहच कार्यक्रम’  हा हाती घेतला आहे.  

महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ.रविंद्र कठारे यांनी सांगितले कि, सत्य, अहिंसा, न्यायचा मार्ग दाखवून, भारताच्या स्वातंत्र्यलढ्यात आपल्या विचारांनी मोलाचे योगदान राष्ट्रपिता महात्मा गांधींनी दिले आहे. गांधीची तत्व, विचार आणि त्यांनी दिलेली बहुमोल शिकवण त्यांच्या नावाप्रमाणेच अमर आहे. जगातील प्रत्येक पिढीला गांधीजींचे विचार प्रेरक ठरतात. त्यात गांधींचे विचार आणि त्या तत्त्वांचे अनुकरण महत्त्वाची भूमिका बजावताना दिसून येते

या कार्यक्रमाचे प्रस्ताविक डॉ.अरुण गंभीरे यांनी केले सूत्रसंचलन प्रा.विश्वास चौधरी तर आभार डॉ.आनंद करडे यांनी मानले. या कार्यक्रमाला गावातील नागरिक, वकील, पोलीस,प्राद्यापक वृंद, पत्रकार बंधू ,आशा कार्यकर्ता आदि उपस्थित होते.


 
Top