लोहारा/प्रतिनिधी

 नवरात्र महोत्सवानिमित्त कै.डॉ.चंद्रकलादेवी पद्सिंह पाटील यांच्या स्मरनार्थ श्री जगदंबा मंदिर ट्रस्ट लोहारा यांच्या वतीने शहरातील चाऊस मैदान, डॉ.बाबासाहेब आंबेडकर वसतिगृह समोर, हिप्परगा रोड येथे दि.16 ऑक्टोंबर 2021 रोजी भव्य खुल्या टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धेचे उद्घाटन भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.

 या क्रिकेट स्पर्धेत 40 सघांनी सहभाग घेतला आहे. यावेळी पहिला सामना हिप्परगा रवा येथील एन.सी.सी क्रिकेट संघ व  धानुरी येथील देवबेट क्रिकेट संघ यांचा झाला. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजेसिंह राजेनिंबाळकर यांच्या हस्ते टॉस करण्यात आले. यावेळी हिप्परगा संघाने टॉस जिंकून प्रथम फलंदाजी घेतली. यावेळी भाजपा युवा मोर्चा जिल्हाध्यक्ष राजसिंह राजेनिंबाळकर, जगदंबा मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष तथा कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दयानंद गिरी, भाजपा तालुकाध्यक्ष राजेंद्र पाटील, कृषी उत्पन्न बाजार समिती माजी सभापती दिनकरराव जावळे पाटील, माजी नगरसेवक आयुब शेख, कॉंग्रेस शहराध्यक्ष के.डी.पाटील, तंटामुक्ती माजी अध्यक्ष अमिन सुंबेकर, स्वप्नील नाईकवाडी, सुरज शेरकर, भाजपा तालुका सरचिटणीस इकबाल मुल्ला, प्रविण जगताप, माणिक चिकटे, कमलाकर सिरसाठ, अनिल बोदमवाड, सचिन कोळी, सतिश गिरी, युवा मोर्चा जिल्हा चिटणीस बालाजी चव्हाण, लक्ष्मण माने, प्रणव गिरी, महेश घोटाळे, सागर गिरी, अस्लम शेख, जमिर शेख, वैभव रोडगे, स्वप्नील थोरात, अस्लम पठाण, चॉंद शेख, विठ्ठल गरड, अतुल राठोड, यांच्यासह ग्रामस्थ व युवक मोठ्या संख्येने उपस्थित होते. या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सतिश गिरी यांनी केले तर आभार दयानंद गिरी यांनी मानले.

 
Top