उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 रुपामाता नॅचरल शुगर्स च्या 3 ऱ्या गळीत हंगामाचा बॉयलर प्रदीपन समारंभ आज पाडोळी येथील प्रगतिशील शेतकरी दाम्पत्य सौ व श्री. शाहूराज गुंड यांच्या हस्ते पाडोळी (आ) येथे पार पडला. कार्यक्रमच्या अध्यक्षस्थानी रुपामाता उद्योगसमूहाचे अध्यक्ष अॅ्ड.श्री व्यंकटराव गुंड पाडोळीकर होते.

याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून पाडोळीचे उपसरपंच श्री. बाबुराव पुजारी महाराज उपस्थित होते. याप्रसंगी श्री. गुंड साहेब  यांनी सर्वाना विजयादशमीच्या हार्दिक शुभेच्छा दिल्या. आपल्या भाषणात श्री.गुंड यांनी आपण यावर्षी नवीन हंगामास सुरूवात करत असून, उस उत्पादक शेतकरी, कर्मचारी, कामगार यांच्या सहकार्यामुळे आपल्या करखान्याने प्रगती केली असल्याचे सांगितले. सध्या कारखान्याचा विस्तार करण्यास चालू असून, यावर्षी पासून आपण कारखान्याची गाळप क्षमता पाहिल्या पेक्षा  वाढवून 1200 TCD पेक्षा अधिक केली असल्याने यावर्षी 125000 मे.टन ऊस गाळप करण्याची योजना असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्यावर्षी पेक्षा अधिक  काळ कारखाना चालवणार असल्याचे तसेच मागील वर्षी कारखान्याने शेतकऱ्याचे उसबिल , ऊस घातल्यापासून दहा दिवसांत अदा केले होते तसेच या वर्षी पण नियोजन करत असल्याचे सांगितले. आगामी काळात आपण इथेनॉल आणि पशुखाद्य निर्मितीचे प्रकल्प सुरू करण्याचा मानस श्री.गुंड  साहेब यांनी व्यक्त केला.

आपल्या भाषणात श्री.पुजारी यांनी कारखान्याची प्रगती व्हावी यासाठी परिसरातल्या शेतकऱ्यांनी श्री.गुंड साहेब यांच्या मागे भक्कमपणें उभे रहावे असे आवाहन केले. कारण पडत्या काळातही गुंड साहेब, शेतकऱ्यांना मदत करत आहेत व इतर कारखान्याच्या तुलनेत रुपामाता उसाला जास्त दर देते असेही ते म्हणाले.

यावेळी जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष श्री.सुधाकर गुंड गुरुजी, प्रगतिशील शेतकरी श्री.हरिदास गुंड, रुपामाता ग्रुपचे MD अॅ्ड श्री.अजितकुमार गुंड पाटील, प्रसिद्ध विधिज्ञ अॅ ड.श्री.शरद गुंड, कारखान्याचे जनरल मॅनेजर श्री.गरडसाहेब,चीफ इंजिनिअर श्री.शिलवंत,मुख्य सुरक्षा अधिकारी श्री. थोडसरे , कृषि अधिकारी श्री.कारभारी, सिव्हिल इंजिनिअर श्री.पठाण,  उपस्थित होते. याप्रसंगी परिसरातील शेतकरी, नागरिक व कामगार मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन  श्री.गरड साहेब यांनी केले.

 
Top