उस्मानाबाद / प्रतिनिधी-

देशात  होत असलेल्या  भरमसाठ पेट्रोल, डिझेल व गॅस दरवाढी विरोधात उस्मानाबाद  जिल्हा राष्ट्रवादी युवक काँग्रेसच्या वतीने राष्ट्रवादी युवक काँग्रेस प्रदेश अध्यक्ष महेबुब भाई शेख व प्रदेश कार्याध्यक्ष  सुरज दादा चव्हाण आणि रविकांत दादा वरपे यांच्या सूचनेवरून  राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी, उस्मानाबाद जिल्ह्याच्या वतीने पेट्रोल ,डिझेल, दरवाढ च्या विरोधात युवक जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे यांच्या नेतृत्वात  तीव्र आंदोलन करण्यात आले.

 या आंदोलनामध्ये श्री गोरे म्हणाले की सतत  चाललेल्या पेट्रोल डिझेल दरवाढीमुळे सर्वसामान्य जनतेचे हाल होत आहेत.  तसेच पेट्रोल-डिझेलची दरवाढ सोबत प्रत्येक जीवनावश्यक वस्तूचे ही दर वाढलेले आहे. त्यामुळे प्रत्येक क्षेत्रातील महागाईत  वाढ आहे आणि वस्तूचे दर गगनाला भिडले आहेत. केंद्र सरकार च्या चुकीच्या धोरणामुळे व निर्णयामुळे देशाची अर्थव्यवस्था कोसळत चालली आहे. त्यामुळे  सर्वसामान्य जनता त्रस्त होत आहे व त्यांचे हाल होत आहेत. केंद्र सरकारने लोकांच्या सहनशक्तीचा अंत पाहू नये असे आव्हान राष्ट्रवादी युवक कांग्रेस पार्टी चे जिल्हाध्यक्ष आदित्य जीवनराव गोरे यांनी  निवेदनाद्वारे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना केले आहे.

पुढील काळामध्ये जर हे पेट्रोल डिझेल गॅस दरवाढ कमी झाले नाही तर मोठ्या स्वरूपाचे आंदोलन  घेण्यात येतील अशी या निवेदनामध्ये संबोधित केले आहेत. केंद्र सरकारने लवकरात लवकर दरवाढ मागे घेऊन  सर्वसामान्य जनतेस  दिलासा द्यावा असे आग्रहाचे आव्हान केले आहे. 

  याप्रसंगी राष्ट्रवादी शहर कार्याध्यक्ष सचिन तावडे, अमोल सुरवसे, राष्ट्रवादी युवक काँग्रेस पार्टीचे जिल्हा कार्याध्यक्ष विवेक शिंदे, जिल्हा उपाध्यक्ष सचिन कदम, जिल्हा सरचिटणीस  शशिकांत नवले, ओबीसी सेल तुळजापूर तालुका अध्यक्ष विकी घुगे, उस्मानाबाद तालुका अध्यक्ष अमरसिंह देशमुख, तुळजापूर तालुका अध्यक्ष संदीप गंगणे, उस्मानाबाद तालुका कार्याध्यक्ष भागवत भंडारकर, तुळजापूर तालुका कार्याध्यक्ष  राजकुमार बोबडे, शरद जगदाळे, उस्मानाबाद तालुका उपाध्यक्ष हृदयेश्वर सुरवसे, तालुका उपाध्यक्ष धीरज पाटील, विजय घोगरे,  विद्यार्थी तालुका कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर निंबाळकर, शहर कार्याध्यक्ष रॉबिन बगाडे, साईनाथ कुऱ्हाडे , शहर उपाध्यक्ष जैनुद्दीन शेख, तुळजापूर तालुका शहर कार्याध्यक्ष बाळासाहेब पेंदे, अनमोल शिंदे, माऊली पाटील पाडोळी, वैभव ढोबळे, सुरज वडवले , कुणाल कर्णवार, व इतर पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

 
Top