उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महाराष्ट्र राज्य गावकामगार पोलीस पाटील संघाच्या वतीने दि. २५ ऑक्टोबर २०२१ सोमवार रोजी दुपारी १२ वाजता औरंगाबाद येथे एक दिवसीय मराठवाडा विभागीय मेळाव्याचे आयोजन करण्यात आले आहे. 

या प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून महसूल मंत्री बाळासाहेब थोरात, माजी विधानसभा अध्यक्ष नाना पटोले,  वैद्यकीय शिक्षण मंत्री अमित देशमुख, विभागिय आयुक्त सुनील केंद्रेकर, औरंगाबादचे  जिल्हाधिकारी सुनील चव्हाण, पोलीस पाटील संघाचे संस्थापक अध्यक्ष भिकाजी पाटील, संघाचे राज्य अध्यक्ष बाळासाहेब शिंदे पाटील, संघाचे कार्याध्यक्ष भृंगराज परशुरामकर पाटील संघाचे कार्यकारी अध्यक्ष श्रीकृष्ण साळुंखे पाटील, संघाचे राज्य सचिव कमलाकर मांगले पाटील, संघाचे राज्य सहसचिव गोरख टेमकर पाटील, राज्य संघटक दिनकर पाटील, मराठवाडा विभागीय अध्यक्ष जब्बारजी पठाण, विभागीय कार्याध्यक्ष राहुल वाकुरे पाटील यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे. मेळावा मथुरा लॉन्स, हर्सूल, औरंगाबाद-फुलंब्री रोड औरंगाबाद येथे सोमवारी दुपारी 12 वाजता होईल.

 मराठवाड्यातील सर्व पोलीस पाटील बंधु, भगिनींनी या कार्यक्रमास आवर्जून उपस्थित राहावे. असे आवाहन गाव कामगार पोलीस पाटील संघाचे जिल्हाध्यक्ष हनुमंत देवकते पाटील, मीडिया जिल्हाध्यक्ष सुभाष कदम पाटील, जिल्हा सचिव धनंजय गुंड पाटील, महिला जिल्हाध्यक्ष सुकुमार फेरे पाटील, अश्विनी वाले पाटील आदींनी केले आहे.

 
Top