वाशी  / प्रतिनिधी-

  वाशी तालुक्यातील हातोला साठवण तलाव निकृष्ट कामासंदर्भात वाशी तालुक्यातील युवासेनेचे उपतालुकाप्रमुख स्वप्निल कोकाटे व माधव बहिर हे तीन दिवसापासून वाशी तहसीलच्या बाहेर उपोषणासाठी बसलेले होते.आज दुपारी भूम-परंडा-वाशी चे आमदार तानाजीराव सावंत यांना याबाबत माहिती मिळताच अधीक्षक अभियंता शिंगाडे यांना ताबडतोब हातोला साठवण तलावावर जाऊन साठवण तलावाची परिस्थिती पाहून उपोषणस्थळी जाऊन आंदोलन स्थगित करण्याचे आदेश देऊन साठवण तलावाच्या गळतीचे काम तात्काळ सुरू करण्याचे आदेश दिले.यावर अधीक्षक अभियंता शिंगाडे यांनी काम उद्यापासूनच सुरू केले जाईल अशी माहिती दिली व स्वतः या कामाचा पाठपुरावा करून याची वेळोवेळी माहिती आपल्याला कळविण्यात येईल अशीही माहिती दिली. याचबरोबर ज्या शेतकऱ्यांचे भूसंपादनाचे पैसे राहिले आहेत त्यांना ते तात्काळ देण्यात यावे.असे आदेश आमदार तानाजीराव सावंत यांनी अधिकाऱ्यांना दिले.यावेळी वाशीचे तहसीलदार नरसिंग जाधव, पोलीस निरीक्षक खनाळ,

 प्रवीण चावरे कार्यकारी अभियंता उपसा सिंचन विभाग उस्मानाबाद,मंडळ अधिकारी शिवाजी उंद्रे युवा सेनेचे माजी तालुका प्रमुख बाळासाहेब मांगले, शिवसेनेचे उपतालुका प्रमुख विकास तळेकर, दिनकर शिंदे,अशोक लाखे,पारा गावचे  उपसरपंच अतुल चौधरी,नितीन रणदिवे,श्रीराम घुले,प्रवीण गायकवाड,राजा कोळी,अनिकेत शिंदे,संदीप घुले,आदी पदाधिकारी उपस्थीत होते.

 
Top