तेर / प्रतिनिधी 

उस्मानाबाद तालुक्यातील तेर येथील तेर बसस्थानक परिसरात स्वच्छता करून शौचालयांची दुरुस्ती करून स्वच्छता करण्याची मागणी  राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे उस्मानाबाद तालुका सचिव सागर गाढवे व महर्षी वाल्मिकी विद्यार्थी संघटनेचे उस्मानाबाद तालुका अध्यक्ष रोहन कोळी यांनी वाहतूक नियंत्रक यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

तेर येथील बसस्थानकातून दररोज मोठ्या प्रमाणात विद्यार्थी, पर्यटक, नागरिक  प्रवास करत असतात. या बसस्थानक परिसरात सध्या घाणीचे साम्राज्य पसरलेले आहे .त्यामुळे अस्वच्छतेचे वातावरण निर्माण होऊन रोगराई पसरत आहे तसेच स्वच्छतागृह देखील अत्यंत खराब व अस्वच्छ झालेले आहे .त्यामुळे महिला व  प्रवाशांची कुचंबणा होत आहे.. तरी विनंती की, तेर येथील बसस्थानक परिसर व स्वच्छतागृहांची दुरुस्ती करून स्वच्छता करण्याची मागणी राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसचे तालुका सचिव सागर गाढवे व महर्षी वाल्मिकी विद्यार्थी संघटनेचे उस्मानाबाद तालुका अध्यक्ष रोहन कोळी यांनी निवेदनाद्वारे वाहतूक नियंत्रक यांच्याकडे केली आहे.


 
Top