उस्मानाबाद / प्रतिनिधी-

सुयोग्य नियोजन आणि कर्तव्य प्रति शुद्ध  हेतू असेल तर कोणत्याही क्षेत्रात शाश्वत यश मिळते असे प्रतिपादन रुपामाता नॅचरल शुगर्स जॅगरीचे चेअरमन ॲड.व्यंकट गुंड यांनी व्यक्त केल.

 रुपामाता नॅचरल शुगर्स जॅगरी (गुळ) पावडर कारखान्याच्या तिसऱ्या गळीत हंगामाच्या शुभारंभ प्रसंगी अॅड. गुंड बोलत होते. यावेळी व्यासपीठावर उस्मानाबाद जनता बँकेचे माजी मुख्य कार्यकारी अधिकारी वसंतराव नागदे,समता सहकारी नागरी पतसंस्था कोपरगावचे संचालक तथा समता चॅरिटेबल ट्रस्टचे सचिव संदिप कोयटे, एम.व्ही.के ॲग्रो फुड्स वाघलवाडा चेअरमन मारोतराव कवळे गुरुजी, उस्मानाबाद नगर परिषदेचे माजी अध्यक्ष मधुकर तावडे,प्रगतशील शेतकरी सत्यवान सुरवसे,जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष सुधाकर गुंड, ॲड.अजित गुंड रुपामाता नॅचरल शुगर्सचे उपाध्यक्ष मनोहर सूर्यवंशी आदींची प्रमुख उपस्थिती होती. 

  कार्यक्रमाची सुरुवात ऊस ट्रॅक्टरचे पूजन व गव्हाणी मध्ये उपस्थित मान्यवर शेतकरी व कर्मचाऱ्यांच्या हस्ते ऊसाची मोळी टाकून करण्यात आली. रुपामाता परिवाराच्या वतीने उपस्थित मान्यवरांचा शाल श्रीफळ आणि श्री तुळजाभवानी देवीजींची प्रतिमा देऊन सत्कार करण्यात आला. तसेच मान्यवरांच्या हस्ते वाहन चालक व मालक यांचा सत्कार करण्यात आला. 

पुढे बोलताना अॅड. गुंड यांनी  रुपामाताच्या या यशस्वी युनिट नंतर माजलगाव तालुक्यातील रोशनपुरी गावांमध्ये ३० एक्कर जागेवर युनिट नंबर २ ची उभारणी करण्यात येत असून डिसेंबर पर्यंत काम पूर्ण होऊन जानेवारी २०२२ मध्ये गाळपास सुरवात होणार आहे. तर तुळजापूर तालुक्यातील देवसिंगा येथे युनिट नं ३ चे काम डिसेंबर पर्यंत पूर्ण होऊन जानेवारी २०२२ मध्ये ऊस गाळप सुरु होणार व    रुपामाता कारखान्याकडे ज्या शेतकऱ्यांनी ऊस दिला आहे त्या शेतकऱ्यांना १० दिवसात पैसे देणारा एकमेव कारखाना असल्याचे त्यांनी यावेळी आवर्जून सांगितले.

  यावेळी वसंतराव नागदे यांनी  देश सुधारण्यासाठी खर्‍या अर्थाने ग्रामीण अर्थव्यवस्था मजबूत ठेवायची गरज आहे आणि याकरिता शेतकरी शेतमजूर यांनी शेतीवर आणि पशुधनावर प्रेम करायला हवे. 

 माजी नगराध्यक्ष मधुकर तावडे बोलताना म्हणाले की, कारखानदारी क्षेत्रात एका बाजूला प्रचंड मरगळ तर दुसऱ्या बाजूला स्पर्धा निर्माण झाली आहे अशा वेळी ऊस उत्पादक शेतकऱ्यांनी रुपामाता साखर कारखान्याला ऊस देऊन सहकार्य करावे, लातूर पॅटर्न प्रमाणे ऊस उत्पादकांना आणि भाव आणि दिलेले असून पाळणारे ॲड व्यंकट गुंड जिल्ह्यात सहकारामध्ये स्वतःचं एक वेगळं अस्तित्व निर्माण करत आहे.  यावेळी  संदीप कोयटे ,मारोतराव कवळे, (गुरुजी) यांनी ही मनोगत व्यक्त केले. 

कार्यक्रमास पाडोळीचे उपसरपंच बाबुराव पुजारी,हरिदास गुंड ,शाहूराज गुंड,दत्तात्रय सोनटक्के, भाऊसाहेब गुंड शिक्षण विस्ताराधिकारी मल्हारी माने ,घोडके, शिव पाटील गाडगीककर,आकाश तावडे,चेतन भुतडा,मरगणे ॲड.शरद गुंड,संदिपान गुंड,प्रशांत गुंडाळे, सतीश जावळे,कांबळे सर कारखान्याचे जनरल मॅनेजर सुर्यकांत गरड,शिलवंत कृषि अधिकारी अजमेर  कारभारी, पठाण, विकास मंडाळे पाडोळी व परिसरातील ऊस उत्पादक शेतकरी नागरिक कामगार उपस्थित होते.  कार्यक्रमाचे सूत्रसंचालन शिक्षक मनसुळे व शेख यांनी केले

 
Top