उस्मानाबाद / प्रतिनिधी-

खास ग्राहकांच्या आग्रहास्तव व व्यापार्यांच्या आर्थिक व्यवहाराची गैरसोय टाळण्यासाठी रुपामाता अर्बन ने सराफ लाईन गवळी गल्ली येथे सोने तारण कर्ज वितरण ( gold loan counter ) सुविधा चालू केली आहे. आपल्या ग्राहकांना अडचणीच्या वेळी गोल्ड लोन सुलभ पध्दतीने मिळावे, यासाठी ग्राहकांना ही सेवा उपलब्ध करून देत आहोत. १८ वर्षापासून रुपामाता संस्था ज्या क्षेत्रात पाऊल टाकेल त्या क्षेत्रात अग्रेसर आहे. संस्थेच्या व्यवसायाची २०० कोटी कडे वाटचाल चालू आहे. तत्काळ व सुरक्षित कर्ज म्हणून संस्थेने आजपर्यंत २८ कोटी रुपये सोने तारण कर्ज वितरीत केले आहे. तसेच रुपामाता संस्थेचे मराठवाड्यातील सर्वात मोठे वेअर हाउस शेतकऱ्यांसाठी व व्यापारी बांधवांसाठी माल साठवणुकीसाठी व मालतारण कर्जासाठी सज्ज आहे. संस्थेच्या विविध सुविधेचा अधिकाधिक ग्राहक लाभ घेतील असा मनोदय रुपामाता परिवाराचे संस्थापक अध्यक्ष श्री. व्यंकटराव गुंड यांनी व्यक्त केला. रुपामाता अर्बन च्या सोने तारण कर्ज वितरण काउंटर चे शुक्रवारी विजयादशमीच्या शुभ मुहूर्तावर उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. कार्यक्रमाची सुरुवात दीप प्रज्वलन करून करण्यात आली. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा सुवर्णकार संघटनेचे अध्यक्ष श्री.संजय गणेश व शहराध्यक्ष श्री. रामदास वंजारी यांची उपस्थिती होती.

विश्वास हा प्रत्येक व्यवसायातील महत्वाचा घटक असून, आपण सर्व या विश्वासाच्या आधारे काम करू व संस्थेला हर प्रकारे मदत करू असे आश्वासन श्री.गणेश यांनी सुवर्णकार संघटनेच्या वतीने बोलताना दिले. त्याप्रसंगी अभय कुमार शहा ज्वेलर्स चे श्री. सिद्धार्थ शहा, गोल्ड सुख ज्वेलर्स चे श्री. ओमासे लक्ष्मण, संस्थेचे संचालक श्री. सुधाकर गुंड गुरुजी, श्री. राजगुरू ज्ञानदेव, श्री.गाडे शंकर, सौ.गाजरे वैशाली, श्री. शरद गुंड, श्री,संदीप गुंड, श्री.अजितकुमार गुंड, श्री.भगीरथ जोशी, विभाग व्यवस्थापक, कर्मचारी व नागरिक उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. सत्यनारायण बोधले यांनी केले.


 
Top