परंडा / प्रतिनिधी : -

 स्वतःच्या अधिकाराबाबत प्रत्येकाने स्वतः जागरूक असले पाहिजे असे मत परांडा येथील दिवाणी न्यायाधीश सोनि यांनी शिक्षण महर्षी गुरुवर्य रा.गे.शिंदे महाविद्यालयात आयोजित केलेल्या कायदेविषयक मार्गदर्शन शिबिर कार्यक्रमांमध्ये विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करतांना म्हटले. 

      कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी दिवाणी न्यायाधीश सोनी हे उपस्थित होते तर व्यासपीठावर दिवाणी न्यायाधीश कोळी , अॅड. यशपाल बगाडे, अॅड. उमेश चंदनशिवे, अॅड. दाभाडे, महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ.दिपा सावळे आणि सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे हे उपस्थित होते.सदर कार्यक्रम तालुका विधी सेवा समिती परांडा आणि महाविद्यालयातील महिला लैंगिक छळ व तक्रार निवारण समिती ,अँटी रॅगिंग समिती व विवेक वहिनी समिती यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित करण्यात आला होता. कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्राचार्या डॉ.दीपा सावळे यांनी केले.आपल्या प्रास्ताविकामध्ये त्या म्हणाल्या की कायद्याचं ज्ञान सर्व विद्यार्थ्यांना माहीत असणे आवश्यक आहे. महाविद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबविले जातात आणि त्या अनुषंगाने विद्यार्थ्यांचे ज्ञान पारंगत केले जाते.विद्यार्थ्यांनी जास्तीत जास्त याचा फायदा घ्यावा .पुढे बोलताना न्यायाधीश सोनी म्हणाले की, कोणतीही गोष्ट करत असताना त्याची कायदेशीरपणे नोंदणी करणे आवश्यक आहे. प्रत्येकाला कायदा माहीत असणे आवश्यक आहे. विद्यार्थ्यांनी स्वतः कायद्याचे ज्ञान घेऊन आपल्या घरा मधील प्रत्येक व्यक्तीला त्याची माहिती देणे आवश्यक आहे.ते पुढे म्हणाले की विद्यार्थ्यांनी मोबाईलचा वापर केवळ चांगल्या कामासाठी करावा व पाहिजे तेव्हाच वापरावा.मोबाईल मध्ये पाहिजे ती माहिती उपलब्ध आहे ती माहिती स्वतः वाचून आपल्या नातेवाईकांना पुरविणे हे आपले कर्तव्य आहे. दिवाणी न्यायाधीश कोळी यांनी सांगितले की अधिकाराची जोपासना करणे व अंमलबजावणी करणे ही जबाबदारी संविधानाने राज्य व्यवस्थेवर सोपवली आहे.संविधानातील वेगवेगळ्या अनुच्छेदामध्ये  मानवाच्या वेगवेगळ्या कारणाने कायद्याची निर्मिती केली आहे.सविधान हा आपल्या देशाचा आत्मा आहे. संविधानाची निर्मिती केवळ मानवजातीच्या कल्याणासाठी केली आहे.            यावेळी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील आई क्यू ए सी चे चेअरमन डॉ. महेशकुमार माने, गणित विभाग प्रमुख डॉ. विद्याधर नलवडे, डॉ. विशाल जाधव, डॉ. सचिन चव्हाण ,प्रा. सचिन साबळे यांच्यासह शिक्षकेतर कर्मचाऱ्यांनी सहकार्य केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ.शहाजी चंदनशिवे यांनी केले तर आभार प्राध्यापक डॉ.विद्याधर नलवडे यांनी मानले. या कार्यक्रमासाठी महाविद्यालयातील विद्यार्थी विद्यार्थिनी covid-19 चे पालन करत ,मास्कचा वापर करून सोशल डिस्टंसिंगचे पालन करत कार्यक्रम  यशस्वी पणे पार पडला कार्यक्रमास प्राध्यापक, कर्मचारी ,विद्यार्थी - विद्यार्थ्यांनी मोठ्या संख्येन उपस्थित होते.

 
Top