उस्मानाबाद / प्रतिनिधी-

महिलांनी स्वःताला सक्षम आणि सशक्त करण्यासाठी त्यांनी न्याय आणि विधी अर्थात कायद्याबाबत साक्षर होण्याची आवश्यकता आहे . यासाठी विधी सेवा प्राधिकरणाच्या शिबिरांचा यासाठी नक्की उपयोग होईल असे प्रतिपादन पोलीस अधीक्षक नीवा जैन यांनी आज येथे केले. जिल्हा परिषदेतील यशवंतराव चव्हाण सभागृह येथे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणामार्फत “आझादी का अमृत महोत्सव” या कार्यक्रमात त्या बोलत होत्या.

यावेळी अप्पर जिल्हाधिकारी रुपाली आवले , महाराष्ट्र व गोवा अधिवक्ता परिषदेचे सदस्य मिलिंद पाटील, जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव तथा दिवाणी न्यायाधीश वरीष्ठ स्तर वसंत यादव, जिल्ह महिला व बालविकास अधिकारी बी.एम निपाणीकर,जिल्हा विधिज्ञ मंडळाचे अध्यक्ष नितीन भोसले, विधी मंडळाचे विधीज्ञ पी.एन लोमटे, तानाजी चौधरी, एम बी माडेकर, डॉ.बापूजी साळूंके विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी,आशा वर्कर आदि उपस्थित होते.

आपल्या संस्कृतीमध्ये जे-जे काही चांगले, पवित्र, उदात्त आहे ते सर्व स्त्रियांच्या सहभागाने साध्य झालेले आहे. सांस्कृतिक मूल्यांची जोपासना स्त्रियांनी जास्त प्रमाणात केली आहे, परंतु हे घडत असताना स्त्रियांवर अन्याय झाला आहे. कुटुंब व्यवस्था टिकवण्यासाठी आणि सांस्कृतिक मूल्य-संवर्धनासाठी स्त्रियांनीच मोठ्या प्रमाणावर त्याग केला आहे.

श्री. निपाणीकर यांनी महिलांसाठी शासकीय योजनांची माहिती दिली .जिल्हा विधीज्ञ मंडळाचे अध्यक्ष नितीन भोसले, विधी मंडळाचे विधीज्ञ पी.एन लोमटे, तानाजी चौधरी, एम बी माडेकर यांनीही मनोगत व्यक्त केली.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ.बापूजी साळूंके आणि विधी महाविद्यालयाचे विद्यार्थी समाधान शेळके यांनी केले . आभार विद्यार्थिनी द्वारका देवळे यांनी मानले . 


 
Top