तुळजापूर/ प्रतिनिधी-

भारत  सरकार माहिती व प्रसारण मंत्रालय क्षेत्रिय लोकसंपर्क ब्युरो,सोलापूर स्वच्छ भारत मिशण- शहरी 2.0 विशेष प्रचार कार्यक्रम अंतर्गत शहर स्वछता अभियान जनजागृती कार्यक्रमाचे उद्घाटन नगराध्यक्ष सचिन रोचकरी यांच्या हस्ते झाले.

 यावेळी  स्वच्छता मिशन कार्यक्रमास प्रमुख प्रवक्ता म्हणुन रमाकांत गायकवाड,अंकुश चव्हाण,अंबादास यादव यांनी   शहर स्वच्छतेबाबत जनजागृती कशा पध्दतीने करावी, ओला कचरा,सुका कचरा कशा पध्दतीने त्याची प्रक्रिया करावी आदी बाबत मार्गदर्शन झाले. 

यावेळी नगरसेवक नानासाहेब लोंढे,गणेश कदम,गुलचंद व्यवहारे,मिनाताई सोमाजी तसेच पालीका अधिक्षक पाठकसाहेब,शेख मँडम तसेच शहरातील सामाजीक संस्था, महीला वर्ग तसेच शहर व तालुक्यातील विद्यार्थी आदी उपस्थित होते.

 
Top