तुळजापूर / प्रतिनिधी-

 माजी मंञी  मधुकरराव चव्हाण यांच्या धर्मपत्नी शालीनीकाकु मधुकर चव्हाण यांच्यावर मंगळवार दि१९रोजी सायंकाळी अणदूर (ता तुळजापूर) येथील आ. चव्हाण यांच्या सोलापूर रोडवरील मळ्यात प्रचंड जनसमुदायाच्या  उपस्थितीत अंत्यसंस्कार करण्यात आले .

शालीनीकाकू चव्हाण यांच्यावर पुणे येथे उपचार चालु असताना त्यांचे सोमवार दि. १८ रोजी राञी  निधन झाले .त्यांचा मृतदेह मंगळवार सकाळी अणदूर येथे आणण्यात आला. त्यानंतर त्यांचे अंत्यदर्शन घेण्यासाठी मोठा जनसमुदाय अणदूर येथे लोटला होता. त्यानंतर घरापासुन अंत्ययाञा  निघाली ती चव्हाण कुंटुंबियांच्या शेतात आल्यानंतर तिथे आ. चव्हाण यांचे पुञ बाबुराव व सुनिल यांनी मुखाग्नी दिला.

यावेळी काँग्रेस नेते माजी मंञी बसवराज पाटील,  खा.  ओमराजे निंबाळकर, आ. कैलास पाटील, आमदार सुरेश धस , सचिन कल्याण शेट्टी  माजी आ सिद्राम म्हेत्रे, विश्वनाथ चाकवते, मंहत तुकोजीबुवा, उल्हास बोरगावकर, धीरज पाटील, सुरेश बिराजदार,  राज्यातील आजी-माजी मंञी आमदार खासदार शासकीय, अधिकारी, पञकार, व्यापारी, उद्योजकांसह तालुक्यातील कार्यकते मोठ्या संखेने उपस्थितीत होते. 

 
Top