उस्मानाबाद / प्रतिनिधी-

 महाराष्ट्र राज्य एकल शिक्षक सेवा मंच जिल्हा शाखा उस्मानाबाद चे वतीने म शिक्षणाधिकारी प्राथमिक याना समायोजन बाबतीत निवेदन देण्यात आले .

शिक्षण विभागातील विस्तार अधिकारी व मुख्याध्यापक यांची पदोन्नती आपण लवकरच करता आहेत त्याबद्दल प्रथमत आपले हार्दिक अभिनंदन.

परंतु पदोन्नती नंतर होणाऱ्या समायोजन प्रक्रियेत शाळेतील सेवाज्येष्ठ शिक्षकांचे समायोजन न करता त्या पदावर आलेल्या शिक्षकांचे समायोजन करण्यात यावे.त्यामुळे सेवाज्येष्ठ शिक्षकावर विनाकारण अन्याय होणार नाही.तरी मे साहेबांनी अमच्या विनंतीचा सहानुभूतीूर्वक विचार करण्याची मागणीचे  निवेदन  कक्ष अधिकारी मां श्री सुरेश वाघमारे यांना देण्यात आले. त्यानंतर म अध्यक्ष जिल्हा परिषद उस्मानाबाद

मा उपाध्यक्ष जिल्हा परिषद व मां मुख्य कार्यकारी अधिकारी  यांना निवेदन देण्यात आले.

त्यावेळी राज्य कोषाध्यक्ष श्री पवन सुर्यवंशी सर, राज्य उपाध्यक्ष श्री शिवाजी पाटील ,जिल्हाध्यक्ष श्री विश्वास आप्पा शिंदे आणि जिल्हा सरचिटणीस श्री दिपक हजारे हे उपस्थित होते


 
Top