उस्मानाबाद / प्रतिनिधी-

उस्मानाबाद शहरासह जिल्हयात वाढता कोरोनाचा धोका पाहता प्रशासनाच्या नियम व अटी नुसार गणेश विसर्जन साध्या पध्दतीने करण्यात आले. त्यामुळे जिल्हा प्रशासनावरील ताण विरहीत गणेश विजर्सन झाले असले तरी विसर्जनस्थळी अग्निशामक दलाची गाडी, रूग्णवाहिका आदी व्यवस्था करण्यात आली होती. 

उस्मानाबाद शहरासह जिल्हयात गणेश विसर्जन मिरवणुका ढोल, ताशा, लेझीम, झांज आदींसह १० ते १२ तास चालत होत्या. परंतु गेल्या दोन वर्षांपासून कोवीड महामारीमुळे केंद्र सरकार, राज्य सरकार व जिल्हा प्रशासन यांनी सार्वजनिक, धार्मिक इतर कार्यक्रमाबाबत कडक नियम लागू केले आहेत. त्यामुळे रविवार दि. १९ सप्टेंबर रोजी तुरळकपणे गणेश विसर्जन करताना श्री गणेश मंडळे दिसून आली. उस्मानाबाद नगर पालिकेच्या वतीने घरगुती श्रीगणेश विसर्जनासाठी गल्लो-गल्लीत विसर्जन रथ फिरविण्यात आला. गणेश मंडळांच्या मोठ्या गणेश मुर्तीसाठी नगर पालिकेने मुर्ती जतन करून ठेवण्याची व्यवस्था केली होती.याचा कांही गणेश मंडळांनी लाभ घेतला. एकंदरीत उस्मानाबाद शहर सह जिल्हयात कोवीड नियम पाळत १० तास चलणाऱ्या मिरवणुका १० मिनिटात उरकून गणेश विसर्जन करण्यात आले. 

तुळजापूरात मंहतांचा हस्ते गणरायाला निरोप

 तुळजापूर नगरपरिषद ने विसर्जनसाठी केलेल्या संकलित विघ्नहर्ता श्रीगणेश मुर्तींचे मंञोपचार गजरात विधीवत मंहत मावजीनाथ, महंत सोमवारगिरी, महंत दत्तअरण्य,   नगराध्यक्ष  सचिन   रोचकरी यांच्या हस्ते पुजन  महाआरती करुन विधीवत  हजारो  श्रीगणेश मुर्तीचे  विसर्जन करून  तुळजापुरातील सर्व महंतांच्या हस्ते गणरायाला निरोप देण्यात आला. 


 
Top