उस्मानाबाद / प्रतिनिधी-

कोंबडवाडी येथे प्रहार अपंग क्रांती आंदोलन उस्मानाबाद संघटनेच्या 99 व्या शाखेचे उद्घाटन प्रहार संघटनेचे जिल्ह्यध्यक्ष मयुर काकडे यांच्या हस्ते संपन्न झाले.

आज पर्यंत कोणत्याही पक्ष,संघटना तसेच सामाजिक संस्था यांना आज पर्यंत अशक्य असणारी गोष्ट प्रहार अपंग संघटनेच्या माध्यमातून होत आहे प्रहार संघटनेच्या 100 व्या शाखेकडे होत असलेल्या वाटचालीकडे पाहून आज आम्हाला देखील अभिमान वाटत आहे असे उदगार गावचे तंटामुक्तीअध्यक्ष भागवत घाडगे यांनी केले.

शाखेच्या अध्यक्षपदी इंद्रजित मिसाळ,उपाध्यक्षपदी सुरेश सोंकांडे,कोषाध्यक्षपदी गोरख सोंकांडे,सचिवपदी रामलिंग कांबळे तर सदस्यपदी संगिता गाडगे,सई सोंकांडे,कविता मिसाळ, दत्ता घाडगे,दत्तात्रय सारंग व इतर दिव्यांग बंधू भगिनी यांची निवड करण्यात आली.

कार्यक्रमाच्या अध्यक्षीय भाषणात जिल्हाध्यक्ष मयुर काकडे यांनी  बच्चू भाऊ यांच्याप्रेरणेने व प्रहार संघटनेच्या केलेल्या कार्याच्या माध्यमातून दिव्यांग,शेतकरी व निराधार व्यक्तींचा विश्वास व प्रेम असंच आमच्या कामाच्या जोरावर मिळवत राहूत आणि  गोर गरीब जनता व आमच्या आजपर्यंतच्या जोडलेल्या सर्व मायबाप जनतेच्या अपेक्षा पूर्ण करन त्यांचे आशीर्वाद घेत राहुत असे आश्वासन गावातील ग्रामस्ताना देतो,असे सांगितले.

शाखेच्या उद्घाटन प्रसंगी संघटनेचे जिल्हा संघटक बाळासाहेब कसबे, जिल्हाउपाध्यक्ष बाळासाहेब पाटील,जिल्हाउपाध्यक्ष शिवाजी पोतदार,उस्मानाबाद शहराध्यक्ष जमीर शेख,तालुकासचिव दिनेश पोतदार,सबदार सय्यद,इस्माईल शेख,इरफान वस्ताद आदी मान्यवर यांच्या हस्ते शाखेतील पदाधिकारी यांच्या नियुक्त्या करण्यात आल्या.


 
Top