तुळजापूर  / प्रतिनिधी-

  श्री राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लबच्या वतीने मराठवाडा मुक्तिसंग्रामचे औचीत्य साधुन पहिल्या टप्प्यात 115,  दुसऱ्यात टप्प्यांमध्ये 100 वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये एकूण 215 वृक्षाचे रोपण करण्यात आले 

दुसऱ्या टप्प्याच्या वेळेस  पोलीस निरीक्षक आजीनाथ काशीद, सहायक पोलीस निरीक्षक सुशील चव्हाण, सहायक पोलीस निरीक्षक कविता मुसळे, पोलीस उप निरीक्षक राहुल रोटे, पोलीस उप निरीक्षक पल्लवी पवार, पुजारी मंडळाचे अध्यक्ष सज्जन राव साळुंके, माजी जिल्हा परिषद अध्यक्ष धीरज भैय्या पाटील यांच्या हस्ते लावण्यात आले .

 संपूर्ण वृक्षाला संरक्षण करण्यासाठी पाच फुटापर्यंत जवळपास दीड एकराला काट्यांचे  वॉल कंपाऊंड केलेले आहे .त्यामध्ये जनावर इतर कुठलीही व्यक्ती त्या वृक्षारोपणामध्येआत जाऊ नये अशी व्यवस्था केलेली आहे खेळ संपल्यानंतर प्रत्येक प्लेयर 10 बाटल्या, प्रत्येक वृक्षाच्या खालच्या बाजूला एक बाटली छोटासे  छिद्र पाडून वृक्षाच्या बुडाशी ठेवले जाणार आहे हे वृक्षारोपण श्री राजा शिवछत्रपती क्रिकेट क्लब च्या माध्यमातून राबविले जात आहे.

 ह्या कार्यक्रमाला उपस्थितीत विपीन शिंदे, नितीन सूर्यवंशी, बबलू सरवदे, अमर गायकवाड, सचिन शिंदे, भागवत साहेब, किरण कदम,  अमोल भैय्या सुरवसे ,यश कदम, सिद्धी  कदम, शिवम काठेवाड, महेश पुजारी ,प्रणव मलबा, सुरज, प्रसाद पेदे , सर्वेश चव्हाण, दया सर,  राज  जेटेथोर, स्वरूप पवार, अजय तोडकरी, सचिन सरकाळे, अतुल साठे, पंचाळ इत्यादी उपस्थित होते.

 
Top