परंडा / प्रतिनिधी : - 

अधंश्रध्दा निर्मुलन व वैज्ञानिक दृष्टिकोन प्रबोधन समिती महाराष्ट्र राज्य च्या सदस्य पदी शशिकला गुंजाळ ‌, उज्वला शिंदे व सुनिता बहीरट .यांची नियुक्ती करण्यात आली. 

अंधश्रद्धा ही समाजाला लागलेली मोठी किड आहे. यात लहान पासून मोठे महिला पुरुष लुबाडले जातात. समाजाला या अधंश्रध्दे पासून दूर करुन वैज्ञानिक दृष्टिकोन देण्याचे महान कार्य काही वर्षा पासून या समिती चे अध्यक्ष श्री तानाजी शिंदे हे करीत आहे. त्यांच्या कार्याची दखल घेत त्यांना पोलीस अधिकारी म्हणून नियुक्ती मिळाली आहे. या कार्याचा विस्तार संपूर्ण महाराष्ट्रात जलद गतीने होत आहे. याचाच एक भाग म्हणून उस्मानाबाद जिल्ह्यातील भूम येथील शशिकला गुंजाळ, सोलापुर जिल्ह्यातील उज्वला शिंदे व पुणे जिल्ह्यातील सुनिता बहीरट यांची राज्य सदस्य पदी अधिकृत निवड करण्यात आली.तसे अधिकृत पत्र त्यांना नुकतेच मिळाले आहे.त्यांच्या या निवडी बद्दल अनेक मान्यवरांनी त्यांचे अभिनंदन केले आहे.


 
Top