परंडा / प्रतिनिधी :- 

येथील शिक्षण महर्षी गुरुवर्य रा. गे.शिंदे महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय साक्षरता दिनानिमित्त आणि शिंदे गुरुजी यांच्या ९७ व्या  जयंतीनिमित्त महाविद्यालयाच्या परिसरामध्ये वृक्षारोपण कार्यक्रम आयोजित करण्यात आला. 

राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि सांस्कृतिक विभागाच्या वतीने कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी महाविद्यालयाच्या प्राचार्या डॉ. दिपा सावळे यांच्या अध्यक्षतेखाली वृक्षारोपणाचा कार्यक्रम घेण्यात आला . प्राचार्या  डॉ दीपा सावळे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले.

  यावेळी कार्यक्रमाधिकारी डॉ.सचिन चव्हाण ,प्रा. सचिन साबळे ,सांस्कृतिक विभाग प्रमुख डॉ. शहाजी चंदनशिवे यांनी कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी पुढाकार घेतला.    यावेळी वनस्पतीशास्त्र विभागाचे विभाग प्रमुख डॉ.प्रकाश सरवदे , डॉ. सचिन चव्हाण ,डॉ अतुल हुंबे, डॉ विद्याधर नलवडे, डॉ.कृष्णा परभणे, प्रा . अमर गोरेपाटील ,कनिष्ठ विभागाचे पर्यवेक्षक प्रा. संजीवन गायकवाड यांच्यासह महाविद्यालयातील अनेक शिक्षकेतर कर्मचारी आदी वृक्षारोपण कार्यक्रमास उपस्थित होते .

 
Top