उस्मानाबाद / प्रतिनिधी-

हैदराबाद मुक्तिसंग्राम अर्थात मराठवाडा मुक्ती दिनाच्या वर्धापन दिनानिमित्त उस्मानाबाद जिल्हा परिषदेत ‘कोरोना योद्धा’ आणि ‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रमाअंतर्गत उत्कृष्ट कार्य करणाऱ्या विभाग प्रमुखांचा सत्कार सोहळा कार्यक्रम घेण्यात आला.

 गेल्या दीड वर्षापेक्षा जास्त काळापासून कोरोना महामारी च्या संकटात जिल्हा परिषदेच्या अंतर्गत येणाऱ्या शिक्षण,आरोग्य महिला बालकल्याण,पाणी व स्वच्छता मिशन विभागातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी उत्कृष्ट सेवा बजावली.तसेच विभागीय आयुक्त सुनील केंद्रेकर यांच्या संकल्पनेतून राबवण्यात आलेल्या सुंदर माझे कार्यालय या उपक्रमा अंतर्गत जिल्हा परिषदे बरोबरच तालुका आणि गाव पातळीवर उत्कृष्ट काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा आणि विभाग प्रमुख यांचा सत्कार जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे यांच्या हस्ते करण्यात आला.

सत्कार सोहळ्यानंतर बोलताना जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा अस्मिता कांबळे म्हणाल्या,जिल्ह्यात वृक्ष लागवड करण्यासाठी ठरवून दिलेल्या उद्दिष्टापेक्षा जास्त प्रमाणात वृक्ष लागवड झाली.याचे श्रेय सर्व विभागप्रमुख अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचे आहे. आपण जिल्हा दौऱ्यामध्ये गाव पातळीवरील अंगणवाडी,प्राथमिक आरोग्य केंद्र,पशुवैद्यकीय दवाखाने यांची पाहणी केली आणि त्यांचा बदललेला चेहरा-मोहरा पाहिल्यानंतर आपल्या प्रयत्नांचे चीज झाल्याचे समाधान मिळाले.

 कोरोना संकटामध्ये सर्व अर्थचक्र बंद असताना देखील गावातील अंगणवाडी-परसबाग आणि पक्ष्यांसाठी चारा ही संकल्पना केवळ या जिल्ह्याने राज्यासाठी आदर्श ठरावी अशा पद्धतीने राबवली. याचे आपणाला निश्चितच कौतुक आहे.

 जिल्हा परिषदेच्या यशवंतराव चव्हाण सभागृह मध्ये झालेल्या कार्यक्रमाला जिल्हाभरातून सत्कार मूर्ती परिवारा सहभागी झाले होते या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन आणि प्रास्ताविक शिक्षण विस्तार अधिकारी माळी यांनी केले.

 या कोरोना योद्ध्यांचा झाला सत्कार....

विजय जाधव (उमरगा) डॉ. कुलदीप मिटकरी,डॉ. ऐवाळे,बिबीषन हजारे, कांचन मधुकर कांबळे मधुकर सदाशिव कांबळे

‘सुंदर माझे कार्यालय’ उपक्रमांतर्गत यांचा झाला सत्कार.....

जिल्हा परिषदेच्या सामान्य प्रशासन विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी पी.एम.राऊत बिबीशन हजारे, ग्रामपंचायत विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी दाताळ आणि सहकारी, लघु पाटबंधारे विभागाचे कार्यकारी अभियंता जोशी आणि सहकारी,बांधकाम विभागाचे नितिन भोसले, वित्त विभागाचे शरद माळी, प्राथमिक शिक्षण विभागाचे सुरेश वाघमारे, सांगळे, माध्यमिक शिक्षण विभागाचे शिक्षणाधिकारी गजानन सुसर आणि सहकारी महिला व बालकल्याण विभागाचे बी.एच. निपाणीकर, आरोग्य पशुसंवर्धन ग्रामीण पाणीपुरवठा कृषी विभाग जिल्हा ग्रामीण विकास यंत्रणा समाजकल्याण आणि पाणी व स्वच्छता मिशन विभाग प्रमुख यांचा यावेळी सत्कार करण्यात आला.

प्राथमिक आरोग्य केंद्र पोहनेर (ता.जि. उस्मानाबाद.) पाथरूड (ता. भूम) सावरगाव (ता. तुळजापूर)  नाईचाकूर (ता. उमरगा) जेवळी (ता. लोहारा) पारगाव (ता. वाशी) दहिफळ (ता.कळंब) जिल्हा परिषद माध्यमिक शाळा वाघोली, (ता.जि.उस्मानाबाद) भूम (ता.भूम) काटी (ता.तुळजापूर) उमरगा भातागळी (ता.लोहारा) वाशी, शिराढोण जिल्हा परिषद प्राथमिक शाळा राजुरी (ता.जि. उस्मानाबाद) रामकुंड ता.भूम) मसला खुर्द (ता.तुळजापूर) केसर जवळगा (ता.उमरगा) बेलवाडी (ता.लोहारा) म्हसोबाचीवाडी (ता.वाशी) भाटशिरपुरा (ता. कळंब) पशुसंवर्धन दवाखाना लोणी (ता.परंडा) उपळा (ता.जि.उस्मानाबाद) पाथरूड (ता.भूम) घोडकी (ता.तुळजापूर) आष्टा (ता.उमरगा) सालेगाव (ता.लोहारा) पारगाव (ता.वाशी) शिराढोण (ता.कळंब)

बाल विकास सेवा योजना अंतर्गत वरवंटी (ता. जि.उस्मानाबाद) शिगोली (ता.जि.उस्मानाबाद) नान्नज वाडी (ता.भूम) मंगरूळ (ता.तुळजापूर) माकणी (ता.लोहारा) सरमकुंडी (ता वाशी)आणि भाटशिरपुरा (ता.कळंब)

 
Top