परंडा / प्रतिनिधी : - 

परंडा तालुक्यातील अनाळा येथे  दि.१७ रोजी पोषण अभियान अंतर्गत पोषण आहार पाककला स्पर्धा आयोजित करण्यात आली होती.येथील अंगणवाडी क्र - ४०३ मध्ये या स्पर्धेचे उद्घाटन सरपंच जोतीराम क्षिरसागर यांच्या हस्ते सावित्रीबाई फुले यांच्या प्रतिमेचे पुजन करून करण्यात आले. या स्पर्धेत अनाळा बीट मधील सर्व गावातील अंगणवाडी सेविकांनी सहभाग घेतला होता. 

   या स्पर्धेसाठी बीट मधील अंगणवाडी सेविकांनी विविध प्रकारचे खाद्य पदार्थ तयार करून स्पर्धे मध्ये भाग घेतला . सर्व पोषण योग्य पदार्थाची मांडणी सुबकरित्या करण्यात आली होती. या पदार्थांमधून सर्वात्कृष्ठ तीन पोषण आहाराची निवड चाचणी द्वारे घेऊन प्रथम , द्वितीय , तृतीय क्रमांक काढण्यात आले . यामध्ये प्रथम क्रमांक कुक्कडगांव येथील अंगणवाडी सेविका अनिता महानवर , द्वितीय क्रमांक मलकापूर येथील एस. बी. येवले अंगणवाडी सेविका ‘ तृतीय क्रमांक हिंगणगांव येथील अंगणवाडी सेविका जी. आर. भांडवलकर यांनी पटकावला . हे तीन विजेते तालुका स्तरीय स्पर्धा साठी पात्र ठरविण्यात आले . हा कार्यक्रम अनाळा बीटच्या  सुपरवायझर श्रीमती लोंढे यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आला. त्यांना अंगणवाडी सेविका वंदना मोरे , रिटे एस. बी. , शेख एच . एस . यांनी सहकार्य केले . कार्यक्रमास ग्रा. प . लिपिक भिवा चव्हाण , अनाळा बीट मधील सर्व अंगणवाडी सेविका मोठ्या संख्येने उपस्थित होत्या . कार्यक्रम यशस्वीतेसाठी अंगणवाडी सेविका वंदना मोरे यांनी अथक परिश्रम घेतले.

 
Top